लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: इयत्ता पहिलीचे शुल्क १० हजार रुपयांनी वाढविल्याने येथील गुरू गोबिंद सिंग पब्लिक स्कुल या शाळेच्या पालकांनी सोमवारी मुख्याध्यापकांना घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. या विषयावर आठ एप्रिल रोजी पालकांसमवेत एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याची तयारी शालेय प्रशासनाने दाखविली आहे.

Girgaon, murder, bicycle,
गिरगावमध्ये सायकलवरून झालेल्या वादातून हत्या
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी
buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण

मागील वर्षी पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला गुरू गोबिंद सिंग पब्लिक स्कुलच्या वतीने राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम सुरू असताना तो केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) मध्ये परावर्तित केला. यावरून पालक आणि शाळा व्यवस्थापन यात काही काळ वाद झाला होता. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कारण पुढे करुन शाळेच्या वतीने या वादावर पडदा टाकण्यात आला होता. यंदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच पहिलीच्या वर्गाचे शुल्क पालकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता १० हजार रुपयांनी वाढविण्यात आले. यामुळे पहिलीत प्रवेशासाठी ४० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अचानक झालेल्या शुल्कवाढीमुळे पालक आक्रमक झाले आहेत. सोमवारी पहिलीचे पालक एकत्र आले. त्यांनी याविषयी शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

शाळेने पूर्वसूचना न देता शिक्षण मंडळ का बदलले, शुल्क का वाढविले, शुल्क वाढवित असतांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणार का, पुस्तके का मिळत नाही, शाळेकडून शैक्षणिक साहित्य खरेदी बंधनकारक का केली जाते, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. शाळेने शुल्कवाढ करतांना शासनाचे कुठलेही नियम आम्हाला लागू नसल्याचे वक्तव्य करुन दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला. शाळा प्रशासन शाळेच्या आवारात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंधित करत असून त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी करणे भाग पडत आहे. पालकांना शालेय वेळेत भेटू दिले जात नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या. मुख्याध्यापकांशी वारंवार संपर्क करुनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मुख्याध्यापकांनी शुल्क वाढीविषयी व्यवस्थापनासोबत चर्चा करुन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पालकांना दिले. या अनुषंगाने आठ एप्रिल रोजी बैठक बोलविण्यात आल्याचेही पालकांना सांगण्यात आले आहे.