मनमाड : ऐन उन्हाळ्यात मनमाड शहराला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. वाघदर्डी धरणातील जलसाठा खालावत चालल्याने शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर करंजवण धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. शहराला आता पूर्ववत १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

आठवडाभरात हे पाणी पाटोदा साठवणूक तलावात येईल. गेल्या महिन्यात शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघदर्डी धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली. पालखेड धरणात अपुरा पाणीसाठा असल्यामुळे पालखेड धरणातून मनमाडसाठी पाणी सोडता येत नव्हते. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहराला १० ते १२ दिवसाआड ऐवजी थेट २० ते २१ दिवसांनी म्हणजे महिन्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ मनमाडकरांवर आली.

With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
nashik water crisis marathi news, nashik water scarcity marathi news
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

हेही वाचा… मनमाड : मातेची बालिकेस मारहाण, समाजसेवकाच्या सतर्कतेमुळे सुटका

हेही वाचा… ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी

या पार्श्वभूमीवर करंंजवण धरणातून मनमाड आणि येवला शहरासाठी आवर्तन सोडण्यात आले. लवकरच पालखेड धरणाद्वारे हे पाणी नगरपालिकेच्या पाटोदा साठवणूक तलावात येणार आहे. त्यामुळे टंचाईतून मनमाडकरांची सुटका होईल. करंजवण धरणातून सोडलेले पाणी पालखेड धरणातून मनमाड व येवला शहरासाठी देण्यात येणार आहे. तब्बल दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आवर्तनाचे पाणी पालखेड धरणातून मनमाड आणि येवला शहराला मिळणार आहे. शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन पालखेडचे आवर्तन सोडावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. आमदार सुहास कांदे यांनी प्रयत्न केले. त्यानंतर पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मनमाड शहरासाठी मंजूर झालेल्या करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. लवकरच मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याचे कांदे यांनी म्हटले आहे.