जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हल्ला करण्याचे काम मोदी सरकार करत असून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नसताना ते मला प्रश्न विचारत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मोदींना लक्ष्य केले. देशातील जनताच त्यांची हुकूमशाही मोडून काढणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आंध्रच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घरातूनच संघर्ष

जामनेर येथे रविवारी दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर टीका केली. जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत एकही नवीन उद्योग आला नाही. खान्देशसह जिल्ह्यात वस्त्रोद्योग उद्यान झाले नाही. केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. केळीचे अनुदानही मिळाले नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांची फसवणूक केली. गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. राहुल गांधी यांच्या पाठीशी देशातील युवक उभे राहत आहेत,  असेही पवार यांनी नमूद केले.

खडसेंचा नाइलाज 

एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याची भूमिका महाराष्ट्रात यापूर्वी नव्हती. आता ती सुरू झाली आहे. त्यातून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. ही परिस्थिती  एकनाथ खडसेंवर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांना काही निर्णय घ्यावा लागला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar questions pm modi on farmer welfare efforts zws