एसटी चालकाची आत्महत्या

पेठ परिसरात कुटुंबासह भाडे तत्वावर घर घेऊन राहत होते.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या पेठ आगारातील बस चालक गहिनाथ गायकवाड (३३) यांनी शुक्रवारी गळफास घेतला. बिकट आर्थिक स्थितीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.  गायकवाड हे मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत.

पेठ आगारात चालक म्हणून ते नियुक्त होते. पेठ परिसरात कुटुंबासह भाडे तत्वावर घर घेऊन राहत होते. राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. गायकवाड यांनी गळफास घेतल्याचे समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. आर्थिक विवंचना, महामंडळाचे संभाव्य खासगीकरण, वेतन कपात या विवंचनेतून ते आत्महत्येच्या निर्णयाप्रत आल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. परंतु, प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गायकवाड यांचा समावेश नसल्याचे पोलीस निरीक्षक दिवार्णंसग वसावे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St driver commits suicide state transport corporation akp

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ नाशिकमध्ये
ताज्या बातम्या