मंडळ अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे काम ठप्प ; ९७ मंडळ अधिकारी, ५५४ तलाठी आंदोलनात सहभागी

संबंधित अधिकाऱ्यास पदावरुन दूर करावे किंवा त्याची बदली करावी, ही तलाठय़ांची प्रमुख मागणी आहे.

मनमाड येथील तलाठी कार्यालय. (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : राज्याच्या ई- महाभूमी प्रकल्प अधिकाऱ्याने समाज माध्यमातून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांविरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरु आहे. जिल्ह्यातील ९७ मंडळ अधिकारी आणि ५५४ तलाठी आंदोलनात सहभागी झाल्याने नागरिकांची विविध कामे ठप्प झाली आहेत.

संबंधित अधिकाऱ्यास पदावरुन दूर करावे किंवा त्याची बदली करावी, ही तलाठय़ांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येईल, असा इशारा नाशिक तलाठी संघाचे अध्यक्ष महेश आहिरे यांनी दिला आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संपामुळे सात-बारा उतारे, फेरफार, बोजा नोंदीचे काम, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, ई पीक पाहणी ही सर्व कामे बंद झाली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामांन्यांना बसत आहे. संपात तोडगा काण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.  तहसीलदारांकडे आठ दिवसांपूर्वीच डिजिटल सिग्नेचर प्रणाली तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी जमा केले आहेत. यामुळे शेतीशी संबंधित अनेक कामे रखडली आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीची कामे वगळता इतर सर्व कामांवर राज्यातील तलाठय़ांनी बहिष्कार टाकला आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची अनेक दिवसांपासूनची ओरड आहे. वेतन महिन्याच्या पाच तारखेपर्यंत नियमित मिळावे, वेतनातून कमी केलेला भत्ता पूर्ववत करावा, कार्यालयीन खर्चाच्या निधीतून टेबल-खुर्ची आणि इतर फर्निचर देण्यात यावे, अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Talathi and mandal adhikari protest against alleged remarks made by senior zws

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ
ताज्या बातम्या