धुळे : चहामधून गुंगीकारक औषध पाजून कुरियर कर्मचाऱ्याकडील ६४ लाख ८० हजार २५३ रुपयांचे दागिने चोरणाऱ्या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांचे सोन्याचे दागिने घेवून मुंबईच्या जय बजरंग कुरियरचा कर्मचारी गोविंद सिकरवार हे १४ जूनच्या पहाटे साडेपाच वाजता नाशिकहून धुळे बसमध्ये बसले. बसमध्ये त्यांना गुंगी आली. धुळ्याला पोहचल्यावर बॅगमध्ये ओले नारळ आणि पाण्याची बाटली ठेऊन कोणीतरी दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सिकरवार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.

उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांचे पथक तपासासाठी उत्तरप्रदेश आणि राजस्थानात रवाना झाले. आग्रा जिल्ह्यातील जाजू गावातून पुष्पेंद्रसिंग  तोमर (३२, रा. धोलपूर, राजस्थान) आणि राहुल सिसोदिया (२५, रा. आग्रा, उत्तरप्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.दोघांकडून ४९ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली आठ लाखाची कार असा एकूण ५७ लाख ३६ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

Bank fraud, forged documents,
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक, लाखोंचे वाहन कर्ज घेणाऱ्या तिघांना अटक
google lay off
Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
nagpur traffic police marathi news, nagpur traffic police collect fine of 5 crores marathi news
नागपूर: तीन महिन्यांत दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई, पावणेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल
Google Focuses on Restructuring, Google going to cuts jobs, google news, google employees, jobs cut, marathi news, google news, google company news, google layoffs 2024, google job cuts, google announces job cut, Google Focuses on Restructuring,
‘गूगल’मध्ये पुन्हा नोकरकपातीचे वारे; प्रमुख संघातील कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात