नाशिक: भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाशिकच्या जागेवर आपल्या नावाची सूचना करूनही महायुतीकडून जवळपास महिनाभरात कुठलीही कृती न झाल्याने एकप्रकारे आपली अवहेलना झाली. शेवटपर्यंत आपले नाव जाहीर केले गेले नाही. हा आपला अपमान असल्याने अखेरीस आपण उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सुतोवाच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत केल्यामुळे महायुतीतील खदखद पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. तीनही पक्षांतील वादामुळे या जागेवरून निर्माण झालेला संघर्ष प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही कायम राहिल्याचे अधोरेखीत झाले आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात लढत होत आहे. अंतर्गत संघर्षामुळे महिनाभर महायुतीला उमेदवार जाहीर करता आला नव्हता. अर्ज भरण्यास दोन दिवसांचा अवधी बाकी असताना अखेरीस ही जागा शिंदे गटाला मिळाली. परंतु, नंतर मित्रपक्षांची नाराजी दूर करताना शिंदे गटाची दमछाक झाली. एकंदर वातावरण लक्षात घेऊन खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रचाराची धुरा हाती घ्यावी लागली. भाजपच्या एका इच्छुकाची नाराजी दूर करण्यासाठी तर रात्री एक वाजता त्यांना संबंधिताच्या घरी जावे लागले. शिंदे गटाने ही जागा प्रतिष्ठेची केली असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Sushant khade accepted the guardianship of two orphans
मंत्रीपुत्राने स्वीकारले दोन अनाथ मुलांचे पालकत्व
satara lok sabha marathi news
अजित पवारांनी आयत्यावेळी शब्द फिरवल्याने साताऱ्यात नाराजी
Mallikarjun Kharge Said This Thing about Narendra Modi
“दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन..”, मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Mahadev Jankar viral video
महादेव जानकरांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, पण त्यांच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही लोटपोट हसाल!
Hemant Godse nashik lok sabha
“…तर निकाल वेगळा असता”, पराभवानंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाने त्यांच्या…”
Ravi Rana On Uddhav Thackeray
आमदार रवी राणांचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा; म्हणाले, “मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसांत…”
nana patole on modi meditation
“पंतप्रधान मोदींनी आता कायम ध्यानधारणाच करावी”, नाना पटोले यांची खोचक टीका; म्हणाले, “प्रचार संपल्यानंतर…”

हेही वाचा : तेजस गर्गे अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी

महायुतीत नाशिकच्या जागेवरून झालेल्या घोळावर भुजबळांनी मुलाखतीतून आपली अस्वस्थता मांडली. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासाठी मागितली होती. परंतु, गृहमंत्री अमित शहा यांनी आपले नाव सुचविले. शिंदे गटाच्या विद्यमान खासदाराची त्यांच्याकडून समजूत काढली जाणार होती. या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी शिरुरच्या जागेचा पर्याय दिला होता. परंतु, आपण त्यास नकार दिला. मुळात नाशिकच्या जागेवर आपण उमेदवारीसाठी इच्छुक नव्हतो. ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणूक लढविण्यास तयार झालो. तयारी सुरू केली. परंतु, अनेक याद्या जाहीर होऊनही आपले नाव येत नव्हते, याकडे भुजबळांनी लक्ष वेधले. मतदारसंघात आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वांच्या पाठबळाने आपण विजयही मिळवला असता. मात्र उमेदवारी याद्या संपत आल्या तरी आपले नाव न आल्याने आपण स्पर्धेतून बाजुला झाल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

हेही वाचा : नाशिक : मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात, गैरप्रकार रोखण्यासाठी ४४ भरारी पथके

भुजबळ यांची नाराजी उघड झाल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी भुजबळ फार्म येथे धाव घेत दीड-दोन तास बंद दाराआड चर्चा केली. भुजबळ नाराज असल्याची चर्चा निरर्थक ठरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केल्याचा दाखला दिला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळ नाराज आहेत, हे आपण ऐकून असल्याचे सांगितले. इतर कुणी नाराज आहेत ते माहिती नाही. भुजबळ यांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार, याचा नेहमी अंदाज असतो, असे त्यांनी सूचित केले. प्रचारासाठी अल्पावधीत चारवेळा मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकला येऊन गेले. शिंदे गटाच्या उमेदवाराचा अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि भुजबळ एकत्रित होते. त्यानंतरच्या तीन दौऱ्यांत उभय नेत्यांची एकदाही भेट झाली नाही.