scorecardresearch

नाशिक : ओझरमधील युवक खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात

ओझर येथील खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे कारण पुढे आले आहे.

नाशिक : ओझरमधील युवक खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नाशिक : ओझर येथील खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे कारण पुढे आले आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ओझर येथे प्रमोद निकाळजे (३२) याचा खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रमोद मृत्यूपूर्वी कोणासोबत होता, याची माहिती पोलिसांनी घेतली. घटना घडली त्या दिवशी जयेश भंडारे आणि रावसाहेब उर्फ संदिप बनसोडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता.

हेही वाचा >>> खळबळजनक! ऐन संक्रांतीला निर्दयी पित्याने दोन्ही मुलांना तिळगूळ ऐवजी दिले विष, स्वत:ही घेतला गळफास

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. प्रमोद आणि संशयित जयेशचे ओझर येथील एकाच महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद होते. १२ जानेवारीच्या मध्यरात्री जयेशने मित्र संदिपसोबत प्रमोदवर हल्ला केला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द ओझर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासी पथकाच्या कामाबद्दल अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकास १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या