जळगाव : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील जांभोरा गावानजीक असलेल्या तलावात धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, धरणगाव येथील लोहार गल्लीत जितेंद्र माळी (२०) हा आई-वडील, भाऊ, बहिणीसह वास्तव्याला होता. त्याचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

सोमवारी सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर जितेंद्र हा तीन-चार मित्रांबरोबर धरणगावनजीक असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावात पोहण्यास गेला. मात्र, थोड्याच वेळात जिंतेद्र हा बुडायला लागला. ते दिसताच त्याच्याबरोबरच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच कुटुंबासह नातेवाइक व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका

हेही वाचा…नाशिक जागेचा तिढा; शिंदे गटाविरोधात भाजप आमदारांचे फडणवीस यांना गाऱ्हाणे

ग्रामस्थांसह पोहणार्‍यांना तीन ते चार तासांच्या प्रयत्नांनंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात यश आले. धरणगाव येथील पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी धरणगाव येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.