08 March 2021

News Flash

न्हावा-शेवा बंदरातून १९१ किलो ड्रग्स जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार कोटी किंमत

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई युनिटची मोठी कारवाई

नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून १९१ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत १ हजार कोटी रुपये आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई युनिटने ही कारवाई केली. अलीकडच्या काळातील अंमली पदार्थ जप्तीची ही मोठी कारवाई आहे. आंतरराष्ट्री तस्करांची टोळी याच्याशी संबंधित असून अफगाणिस्तानातून हा माल आल्याची शक्यता आहे.

कंटेनरमधील माल मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना डीआरआयने मुंबईतून अटक केली. समुद्रमार्गे हे हेरॉइन पाठवण्यात आले होते. डीआरआय, न्हावा-शेवा आणि कस्टम असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. मुंबई मिररने हे वृत्त दिले. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे बेकायदरित्या अंमलीपदार्थ आणण्याचा प्रयत्न केला जातो. तिथून मग संपूर्ण देशात वितरण केले जाते.

या प्रकरणी दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मागच्यावर्षी मे महिन्यात तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोट पकडली होती. त्यातून २०० किलो हेरॉइन जप्त केले होते. त्याची किंमत ६०० कोटी रुपये होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 11:27 am

Web Title: 191 kg of drugs worth rs 1000 crores seized at nhava sheva port dmp 82
Next Stories
1 नवी मुंबईत आज ३३२ नवे करोनाबाधित, आठ जणांचा मृत्यू
2 नवी मुंबई शहरात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक ४५५ नवे करोनाबाधित
3 करोना रुग्णांसाठी पालिकेचा ऑनलाइन माहितीफलक
Just Now!
X