नागरीकरणामुळे जंगले नष्ट झाली आहेत. त्यामुळे विषारी साप तसेच विंचूचा शहरातील वावर वाढल्याने उरणमधील विषारी व बिनविषारी सापांचे तसेच विंचवाचे दंश होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात जून महिन्यात साप चावल्याच्या २५ तर विंचवाने दंश केल्याच्या १० घटनांची नोंद आहे. तर जुलैच्या अवघ्या दहा दिवसात विषारी सापाने दंश केल्याच्या ८ घटना घडल्या आहेत.

उरणमधील शेती तसेच जंगले औद्योगिकीकरण व नागरीकरणाच्या रेटय़ात उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सापांचे आश्रयस्थानच नष्ट झाल्याने अन्नाच्या शोधात त्यांचा ओघ आता शहरांकडे येवू लागला आहे. त्यामुळे सध्या उरण परिसरात या विषारी जीवांच्या दंशच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांच्या घरात नाग, अजगर, धामण आदी जातींचे साप आढळले आहेत.

वाढत्या सर्प दंशामुळे अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासकीय रुग्णालयात त्यांच्यावर आवशक ते उपचार केले जात असून विंचवांने दंश केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे  पावसाळ्यात नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

-डॉ.मनोज बद्रे, अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण.