नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३८८ नवे करोनाबधित आढळले असून, करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. तसेच, मृतांची संख्याही दररोज  वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १३  हजार ६१८ झाली आहे.

शहरात आज  १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३८८ झाली आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ८ हजार ८३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ४ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात विविध ठिकाणी प्रतिजन चाचण्या करण्यात येत आहेत.त्यामुळे तात्काळ करोना चाचणी अहवाल प्राप्त होत असून शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. पालिकेने मिशन ब्रेक द चेन मोहिम सुरू केली आहे.