नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २७  हजार ५०० पार झाली असून शहरात करोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. शहरात आज ४१९ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून,  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या २७ हजार ५३१ झाली आहे. शहरात आज चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ६१५ झाली आहे.

शहरात आतापर्यत एकूण  तब्बल २३ हजार  २७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ६५५ जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचादर ८५ टक्के झाला  आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात १९ हजार २१८ नवे करोनाबाधित आढळले. तर, ३७८ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख ६३ हजार ६२ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले ६ लाख २५ हजार ७७३ जण, २ लाख १० हजार ९७८ अॅक्टिव्ह केसेस आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या २५ हजार ९६४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.