रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन करूनही त्यास न जुमानणाऱ्या प्रवाशांचा बुधवारी ‘सत्कार’ करण्यात आला. तुभ्रे येथे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी गुलाबाचे फूल देऊन सत्कार केला. या वेळी माजी परिवहन सभापती अन्वर शेख, आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक के. के. अंबावत यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सकाळी कामावर जाण्याच्या वेळी अनेक प्रवासी व पादचारी तुभ्रे रेल्वे स्थानकातील रूळ ओलांडून पलीकडे जातात. यामुळे अनेक अपघातही घडले आहेत. याबाबत आरपीएफ, रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनही जनजागृती करत आहेत. मात्र तरीही वेळ वाचावा किंवा चालण्यास अधिक श्रम पडू नयेत यासाठी अनेक जण जीव मुठीत धरून रूळ ओलांडतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2015 2:58 am