रिलायन्स कंपनीच्या जनरल मॅनेजरला खंडणीसाठी धमकावणाऱ्या एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप जैसवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने अनेकदा तुरंगवास भोगला आहे. तुरुगांत असतानाच त्याची आणखी काही गुन्हेगारांशी ओळख झाली. त्यांच्याच नावाने हा आरोपी या रिलायन्स कंपनीच्या जनरल मॅनेजरला धमकावत दीड करोड रुपयाचे खंडणी मागत होता. अन्यथा जिवे ठार मारण्याची धमकी मोबाइलवरुन दिली होती. या प्रकरणी जनरल मॅनेजरने नवी मुंबई खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाइल नंबर ट्रेस करून त्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.