News Flash

नोकरी डॉट कॉमवर नोंदणी करणार असाल तर जपून..

नवी मुंबई पोलीसांनी रोजगारासाठी आपली माहिती जाहीर करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन तरूणांना केले आहे.

एका व्यक्तीला नोकरीला लावतो असे सांगून, साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यांच्या शोध नवी मुंबईचे पोलीस घेत असताना त्यांना देशभरातील अनेक तरूण बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या दुकलीला पकडणे शक्य झाले. देशभरातील सूमारे शंभराहून अधिक तरूणांची ५० लाख रुपयांची या नायजेरीय तरुणांच्या दुकलीने फसवणूक केल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले. बेलापूर पोलीस ठाण्यात एका तरूणाने दिलेल्या फीयार्दीवर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ही माहिती उघड झाली. फसवणूक करणारी दुकली नोकरी डॉट कॉमवरुन आपले सावज ठरवत असत. त्यामुळे नवी मुंबई पोलीसांनी रोजगारासाठी आपली माहिती जाहीर करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन तरूणांना केले आहे.

उत्तरांचल येथील मूळ राहणारा बलवंतसिंग बिस्त हा बेलापूर येथील दिवाळा गावात राहतो. बलवंत यांने आपल्याला अमेरिकेत नोकरी मिळावी म्हणून नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवले होते. तसेच या संकेतस्थळावर आपली वैयक्तिक माहितीही सींग यांनी जोडली होती. बलवंत यांना यापुर्वीचा मलेशियातील हॉटेलमध्ये आचारी कामाचा अनुभव असल्याने त्याहून जास्त पगार अमेरिकेत मिळावा अशी अपेक्षा बलवंत यांनी संकेतस्थळावर व्यक्त केली होती. त्यामुळे बलवंत यांना एकाने संपर्क साधून त्यांच्या इमेलवर ह्य़ुटन हॉटेल येथे नोकरी लावतो, त्यासाठी व्हीसा व अमेरिका पारपत्र विभागाचे कागदपत्रे पाठविले. या व्यक्तीने स्वताला अमेरिकन कंपनीचा अधिकारी सांगत साडेतीन लाख रुपयांचा पगार देण्यासाठी बलवंत यांच्याशी इंग्रजी भाषेत संपर्क साधत त्यांना आपण या अमेरिकन कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर प्रोसेसिंग शुल्क म्हणून सींग यांना आयसीआयसीआय बॅंक व इतर बॅंकांच्या खात्यांमध्ये सूमारे तीन लाख ४८ हजारा रुपये जमा करण्यास सांगीतले. महिन्याला सींग यांना अमेरिकेला साडेतीन लाख रुपये पगार मिळणार असल्यामुळे बलवंतने पैशांची जुळवाजुळव करुन या रकमेचा बंदोबस्त केला. मोबाईल फोनवरील व्यक्तींशी प्रत्यक्षात न भेटता सींग यांनी समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवून या बॅंक खात्यामध्ये या रकमा जमा केल्या. मात्र काही दिवसांनी ज्या मोबाईल फोनवरुन बलवंतला कंपनीचे अधिकारी संपर्क साधयचे तो मोबाईल फोन अचानक बंद झाला. त्यानंतर हे प्रकरण बेलापूर पोलीस ठाण्यात सींग यांनी दाखल केले. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. बंद मोबाईलच्या माहितीवरुन पोलीसांनी या दुकलीचा राहण्याचा शोध लावला. मुंबई येथील नालासोपारा येथील वलईपाडा येथील संतोष भवनमधील किशोर कंपाऊंडमधील एकविरा इमारतीमध्ये खोली क्रमांक १०५ च्या बाहेर पोलीसांनी सापळा लावला. मात्र बोलणाऱ्या व्यक्ती त्याच आहेत का, याची शहनिशा करण्यासाठी पोलीसांनी बलवंत यांना त्यावेळी आपल्यासोबत ठेवले.

बलवंत याच्यासोबत इंग्रजीत केलेल्या संभाषणाच्या आवाजाच्या आधाराशिवाय पोलीसांकडे इतर कोणताही पुरावा नव्हता. अखेर रात्री या दुकलीमधील एकजण फोनवर बोलल्यानंतर त्याचा आवाज तोच असल्याचे बलवंतने पोलीसांनी सांगीतल्यावर या दुकलीला पकडले. हे दोघेही नायजेरीयन नागरिक असून अलाईदजुईगबे अथोबामी जॉन (वय २८) आणि अकेरेलेअसाईड तयो (वय २७) असे या दोघांची नावे आहेत. पोलीसांनी या दोघांच्या घरातून ३ लॅपटॉप, १२ मोबाईल फोन, १ आयपॅड, एक पेनड्राईव्ह, एक राऊटर व ५ इंटरनेटचे डोंगल असा माल जप्त केला. तर या लॅपटॉपमध्ये परदेशातील नामांकित कंपन्या व हॉटेलमधील नोकरीचे अर्ज, कंपन्याचे लेटरहेड अशीही दस्तावेज पोलीसांना सापडले. या दुकलीने देशभरातील परदेशी नोकरीची अपेक्षा करणाऱ्या शंभराहून अधिकजणांना बलवंतसारखेच फसवल्याचे पोलीसांच्या तपसाता निष्पन्न झाले. २०१० पासून ही दुकली भारतात आली. त्यामध्ये तयो याचे पारपत्र संपले आहे. तर मिरारोड येथील एका कॉलेजमध्ये शिक्षणाच्या नावावर अलाईडजुईगबे येथे राहत आहे. या दोघांनी आयसीआयसीआय या एकाच बॅंकेतून ३९ लाख रुपयांमधील २८ लाख रुपये काढल्याचे पोलीसांना समजले. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बनसोडे व त्यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:15 am

Web Title: be careful if you are going to register on naukri com
Next Stories
1 रिक्षाचालक परवाना मिळवण्यासाठी बनावट पत्ते
2 आयटी टाऊनशिप होऊ देणार नाही
3 प्रकल्पग्रस्तांना हॉकर्स झोनमध्ये जागेची सिडकोकडे मागणी
Just Now!
X