22 November 2019

News Flash

कामोठे येथे दुहेरी हत्याकांड

एका व्यसनाधीन व्यक्तीने वहिनी आणि पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठेमध्ये सोमवारी घडली.

(संग्रहित छायाचित्र)

पनवेल : कौटुंबिक वादातून एका व्यसनाधीन व्यक्तीने वहिनी आणि पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठेमध्ये सोमवारी घडली.

सुरेश चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. कामोठे वसाहतीत सेक्टर ३४ येथील एकदंत अपार्टमेण्टमध्ये सुरेश हा आपला विवाहित छोटा भाऊ योगेश, त्याची पत्नी जयश्री आणि दोन वर्षांचा मुलगा अविनाश यांच्यासह राहत होता.

सुरेश बेरोजगार असून, त्याला व्यसनही आहे. त्यामुळे योगेशने काही महिन्यांपूर्वी त्याला घराबाहेर काढले होते. त्याच रागातून सुरेशने पुतण्या अविनाशला गळा आवळून ठार केले. त्यानंतर त्याने जयश्रीची हत्या केली. सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजल्यानंतर योगेश कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोघांचा खून केल्यानंतरही सुरेश घरातच झोपून होता.

दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेमुळे कामोठे परिसर हादरला आहे. पोलिसांनी सुरेशला अटक केली असून, बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी सुरेशला पोलिसांसमोर मारहाण केली.

First Published on September 11, 2019 3:49 am

Web Title: double murder at kamothe zws 70
Just Now!
X