News Flash

घराच्या वादातून मुलाची हत्या

धोंडीराम गायकवाड (वय ८१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

राहत्या घरावरून मुलगा व वडिलांचे वाद विकोपाला गेल्याने ८१ वर्षीय वडिलांनी ५८ वर्षीय मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तुर्भे स्टोअर परिसरात घडला आहे. यातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

धोंडीराम गायकवाड (वय ८१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोंडीराम आपल्या परिवारासह बाबा गल्ली तुर्भे स्टोअर येथे राहतात. त्यांचा मुलगा आणि त्यांच्यात राहत्या घरावरून वाद होते. मिलिंद हा विवाहित होता. मात्र त्याची अन्य एका महिलेसोबत जवळीक वाढली होती. राहते घर माझ्या नावावर करून द्या, असा तगादा मिलिंद याने लावला होता. रविवारी त्यांच्यात वाद झाल्यानंतर झोपलेल्या अवस्थेत धोंडीराम यांनी मिलिंदच्या डोक्यात फावडे मारले, यात त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:17 am

Web Title: home son murder akp 94
Next Stories
1 ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचे हाल
2 सिडकोच्या घरांसाठी दोन दिवसात  दहा हजार अर्ज
3 कांदा आणखी कडाडणार
Just Now!
X