News Flash

कुटुंबसंकुल : पाणी अडवा पाणी जिरवा

केसर गार्डनमध्ये स्थापनेपासूनच दूरदृष्टीने विचार करून विविध सुविधा निर्माण करण्यात आला.

केसर गार्डन, खारघर, सेक्टर २०

केसर गार्डन, खारघर, सेक्टर २०

पाण्याची समस्या अनेक संकुलांत असते, मात्र काही संकुले या पाणीटंचाईवर पर्यावरणपूरक मार्ग शोधून काढतात. खारघरमधील सेक्टर २० येथील केसर गार्डनने त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र अवलंबले आणि पाणी प्रश्न स्वत:च्याच स्तरावर निकाली काढला.

केसर गार्डनमध्ये स्थापनेपासूनच दूरदृष्टीने विचार करून विविध सुविधा निर्माण करण्यात आला. आज येथील रहिवाशांना त्याचा लाभ होत आहे. गेल्या १० वर्षांपासून खारघर शहराचा विकास झपाटय़ाने होत आहे. शहरातील संकुले सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आहेत. गगनचुंबी इमारती आणि अद्ययावत सुविधा असलेल्या संकुलांत सेक्टर २० मधील केसर गार्डनचा समावेश होतो.

सुरुवातीच्या काळात खारघरमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असे. २०१०ला हे संकुल स्थापन झाले तेव्हाही ही समस्या होती. संकुलात एकूण ३३६ कुटुंब वास्तव्यास आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी पाणी प्रश्न भेडसावू नये याकरिता सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात आले. त्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे सूत्र वापरण्यात आले. पावसाळ्यात इमारतींच्या छतावर पडणारे पाणी जमिनीत साठवून ठेवण्यात येते, तसेच संकुलाची स्वतंत्र कूपनलिकादेखील काढण्यात आली आहे. खारघरमध्ये पाणी समस्या बिकट आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी कूपनलिका आणि साठवलेल्या पाण्याचा वापर घरगुती कामांसाठी व उद्यानासाठी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला.

संकुलात काही समाजोपयोगी उपक्रमही राबवले जातात. गेल्या चार वर्षांपासून लायन्स क्लब सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दान केले जाते. लायन्स क्लबशी टायअप करून जुने कपडे, निधी, धान्य, औषधे अन्य उपयोगी वस्तू सामाजिक संस्थांना दान करण्यात येतात. कपडे व इतर वस्तू या दर तीन महिन्यांनी दिल्या जातात. दर महिन्याला अन्नदान  केले जाते.  या संकुलात सर्व सण साजरे केले जातात. उत्सवकाळात संकुलातील रहिवाशांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. हस्तकला, चित्रकला, नृत्य इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांकरिता फॅशन शो आयोजित केले जातात.

संकुलात कडक सुरक्षा व्यवस्था असून त्यात शक्य त्या सर्व सुधारणा करण्याचा मानस असल्याचे येथील सदस्य सांगतात. संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोसायटीच्या आवारात इंटरकॉम प्रणाली असून ती प्रत्येक सदनिकेशी जोडण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांनी ओळखपत्र स्वाइप केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. संकुल अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी येथील प्रत्येक रहिवाशाला ओळखपत्र देण्यात येणार आहे.

सोसायटीतील पार्किंगसाठीची जागा अपुरी पडू लागली आहे. अवघ्या १२० चारचाकी गाडय़ांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. यावर तोडगा म्हणून येथील सोसायटी सदस्यांनी दुचाकीसाठी वेगळी व्यवस्था केली आहे.

भविष्योउपयोगी योजना

कचरा वर्गीकरण, कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि शून्य कचरा असा प्रवास करण्याची तयारी केसर गार्डनमधील रहिवाशांनी सुरू केली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी संकुलाच्या आवरत सौरदिवे बसविण्यात येणार आहेत.

पारितोषिके

संकुलातील सदस्यांच्या कलागुणांना आणि आवडींना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. सोसायटीतील सर्व रहिवासी खारघर मरेथॉनमध्ये एकत्रीच सहभागी होतात. त्यामुळे केसर गार्डनला खारघर मरेथॉनमध्ये मेगापार्टीसिपेशन या पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच दर तीन महिन्यांतून एकदा स्वच्छता अभियान राबविले जाते. त्याबद्दल संकुलाला आयसीआयसीआय या बँकेने गौरवले आहे. अनेकदा आरोग्य शिबिरे घेतली जातात. आग लागू नये म्हणून आणि लागल्यास काय करावे याची माहिती रहिवाशांना मिळावी म्हणून अग्निशमन दलाच्या मदतीने कार्यशाळा घेऊन प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:25 am

Web Title: kesar gardens sector 20 kharghar mumbai navi
Next Stories
1 जीवघेणी कसरत थांबणार
2 टोलेजंग इमारतींचा हव्यास उद्योगांच्या मुळावर
3 तळोजातील उद्योग गुजरातच्या मार्गावर!
Just Now!
X