News Flash

फेरीवाला परवाना मराठी बेरोजगार तरुणांना देण्याची मागणी

तरुण बिहार व उत्तर प्रदेशातून येऊन पनवेलमध्ये फेरीवाला म्हणून स्थिरावला आहे.

मराठी बेरोजगार तरुणांना फेरीवाला परवान्यामध्ये प्रथम प्राधान्य असावे,

शहरात हजारो बेकायदा फेरीवाल्यांना अधिकृत परवाने देऊन अधिकृत करण्याचा घाट पनवेल नगर परिषदेने सुरू केला आहे त्यामुळे परवाने देणारच असाल तर मराठी बेरोजगार तरुणांना द्या, अशी मागणी पनवेल शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषदेला केली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तशी रीतसर लेखी मागणी नगर परिषदेच्य्या उपमुख्याधिकारी चारुशीला पंडित यांच्याकडे केली. परप्रांतीय तरुण बिहार व उत्तर प्रदेशातून येऊन पनवेलमध्ये फेरीवाला म्हणून स्थिरावला आहे. तसेच मुंबईहून सकाळी येणारे परप्रांतीय तरुण शहरात येऊन हातगाडय़ांचा व्यवसाय करतात. त्यामुळे परवान्यांचे वाटप करताना मराठी बेरोजगार तरुणांना फेरीवाला परवान्यामध्ये प्रथम प्राधान्य असावे, अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनातून केली आहे. नगर परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या २०१६ -१७ च्या अर्थसंकल्पामध्ये फिरत्या हातगाडय़ांसाठी वर्षांला पाच हजार शुल्क आकारण्याची तरतूद केली आहे. शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र शहरातील रस्ते किती त्यावर हातगाडय़ा किती आणि भविष्यात किती व कोणत्या फेरीवाल्यांना नवीन परवाने मिळणार याबाबत अजून कोणतेही धोरण नगर परिषदेने ठरविलेले नाही. पाचशे हातगाडय़ांची क्षमता असणाऱ्या पनवेलमध्ये आजमितीला साडेतीन हजार हातगाडय़ा असल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 12:22 am

Web Title: mns demand to give hawker license to marathi unemployed youth
Next Stories
1 नवीन नियम मच्छीमार व्यवसाय बंद पाडणारा
2 उरणमध्ये राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन
3 ऑटो रिक्षा परवानासाठी मराठी भाषेची मौखिक चाचणी
Just Now!
X