मे महिना सरला असला तरी उन्हाळ्याच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यात शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने घामांच्या धारांनी न्हाऊन निघाले आहेत. दर शुक्रवारी शहरात भारनियमन केले जाते. याच वेळी इतर दिवशीही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दिघा, घणसोली, कापेरखरणे आणि तुभ्रे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना काहिलीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
दुकानदारही भारनियमनामुळे त्रासले आहेत. यावरून येथील नागरिकांनी ठाणे-बेलापूर मार्गावर रास्ता रोकोही केला होता. यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता एम. एन. मुंगे यावंी मान्सूनपूर्व कामे सुरू असल्याने वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे ‘महामुंबई वृत्तांत’शी बोलताना सांगितले.