03 December 2020

News Flash

नवी मुंबईत ‘सोनचिखल्या’चा पाहुणचार

करावे, खारघर खाडीकिनाऱ्यावर आगमन

खाद्याच्या शोधात दरवर्षी नवी मुंबईतील खाडीकिनारी परदेशी पक्षी येत असतात.

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : खाद्याच्या शोधात दरवर्षी नवी मुंबईतील खाडीकिनारी परदेशी पक्षी येत असतात. करावे आणि खारघरच्या खाडीकिनाऱ्यावर सध्या पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोनचिखल्या वा सोनटिटवी) हा परदेशी पाहुणा आला असून पक्षिप्रेमींना आकर्षित करीत आहे. या पक्ष्याचा मुक्काम पुढील दोन आठवडे असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल, असे पक्षिमित्र नीलेश तांडेल यांनी सांगितले.

खाद्याच्या शोधात अलास्का येथून म्हणजेच ९ हजार ८०० किलोमीटरचे अंतर कापून हा पक्षी आल्याचे तांडेल यांनी सांगितले.

इंग्रजीत या पक्ष्याचे नाव पॅसिफिक  गोल्डन प्लोव्हर असून मराठीत त्याला सोनचिखल्या वा सोनटिटवी असे म्हणतात. संस्कृतमध्ये स्वर्ण टिट्टम असे म्हटले जाते.

दररोज किमान दोन हजार किलोमीटरचे अंतर हा पक्षी प्रवास करतो. आशिया खंडात मुक्कामाचे त्याचे आवडते ठिकाण म्हणजे खाडीकिनारा आहे.

पेंग्विनप्रमाणे नर-मादी यातील फरक कळत नाही. खाद्य गोगलगाय, चिंबोरी, कोळंबी, छोटा तरंगणारा जवळा हे आहे.

नवी मुंबईच्या खाडीकिनारी हे मुबलक खाद्य मिळत असल्याने तो या ठिकाणी येत असतो. त्याच्या पाठीवरील सोनेरी, करडे ठिपके अधिकच खुलून दिसतात. या पक्ष्यासह गॉड विट (पाणटिटवा), युरेशियन पक्षी स्टीट्स (शेकोटय़ा), कोरेला (ठिपक्यांचा तिलब्रा) सॅण्ड पायलर (तिंबा), पाइड अव्होकेड (उचल्या), कॉमन स्पाइप (पाणकावळा) हे पक्षीही दिसू लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 1:43 am

Web Title: pacific golden plover sonchikhalya sontitvi bird in navi mumbai dd70
Next Stories
1 पनवेलकरांसाठी मेट्रोचे दिवास्वप्न?
2 एनएमएमटीला आर्थिक झळ
3 दिवाळीनंतर पालिका रुग्णालय सार्वजनिक
Just Now!
X