५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील ‘द कॉन्शन्स’ या नाटकाचा प्रयोग बुधवार, २० जानेवारीला सायंकाळी ७ वाजता येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात रंगणार आहे. अमेय दक्षिणदास लिखित आणि मनोज डाळिंबकर दिग्दर्शित या नाटकाची ‘आमचे आम्ही, पुणे’ या संस्थेने निर्मिती केली आहे. प्रणव जोशी, श्रुती कुलकर्णी आणि मनोज डाळिंबकर यांच्या या नाटकात भूमिका आहेत.
माणसाने केलेल्या प्रत्येक गुन्ह्य़ाबद्दल त्याला शिक्षा मिळतेच; पण ही शिक्षा त्याला देव देत नाही. कारण तो दयाळू आहे. दैव देत नाही, कारण ते संचित आहे. नियतीही देत नाही. कारण ती तटस्थ आहे. हे सगळे तुम्हाला शिक्षेची भीती दाखवतात. प्रत्यक्षात शिक्षा देतो तो तुमचा ‘कॉन्शन्स’. तुमची सदसद्विवेकबुद्धी. गुन्ह्य़ापासून परावृत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करणाराही तोच आणि हातून घडणाऱ्या गुन्ह्य़ाला कठोर शिक्षा देणाराही तोच. ज्याचा त्याचा ‘कॉन्शन्स’ हा विचार हा या नाटकात मांडण्यात आला आहे.