नवी मुंबई : कोपरखैरणेत झालेल्या रोहन तोडकर हत्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना गोव्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांची नवी मुंबईत आणल्यावर चौकशी होणार आहे. अटकेसंदर्भातील संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित झाल्याने कोपरखैरणे परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मराठा समाजाने २४ जुलै रोजी पुकारलेल्या बंदच्या काळात अज्ञात तरुणांनी पाच ते सहा तरुणांना बेदम मारहाण केली होती. त्यात जखमी झालेला रोहन तोडकर हा कोपरखैरणेतील २२ वर्षीय युवक उपाचारांदरम्यान मृत्युमुखी पडला.  ३० जुलैला एका आरोपीला अटकही करण्यात आली. गुरुवारी गोव्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांपैकी एक जण तोडकरी हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून असल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही या सर्वाची चौकशी होणार आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

याआधी घडलेल्या घटना पाहता अटकेच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा वातावरण बिघडू नये म्हणून, पोलिसांनी खबरदारी घेत बंदोबस्तात वाढ केली आहे.

गोव्यातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली.