News Flash

नावडे येथे वखारीला आग

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नावडे येथे वखारीला आग

मुंब्रा-पनवेल महामार्गावर नावडे गावालगतच्या लाकडाच्या एका वखारीला मंगळवारी दुपारी आग लागली. तळोजा औद्योगिक विकास महामंडळ आणि सिडकोच्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या साह्य़ाने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या आगीची व्याप्ती मोठी असल्याने महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी बंद करण्यात आली. नावडे फाटा ते नावडे गावादरम्यान अतिक्रमण केलेल्या झोपडय़ांमध्ये भंगार माफियांनी साम्राज्य उभारले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 2:15 am

Web Title: warehouse fire at navade
टॅग : Fire
Next Stories
1 गस्त पथकांची प्रथमच एकत्र फेरी
2 कामोठय़ातून भोंदूबाबाला अटक
3 पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण
Just Now!
X