नवी मुंबईतील वाशी नोड सेक्टर ११ जुहू गाव येथे एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेची हत्या जुहूगाव स्थित संकल्प लॉजमध्ये झाली असून आज (रविवारी) दुपारी चारच्या सुमारास एक जोडपे या ठिकाणी आले होते. त्यातील पुरुषाने अशोक दळवी नावाने एक रूम बुक केली. त्याचे पॅन कार्ड दाखवून ही रूम बुक करण्यात आली.
रूममध्ये या जोडप्याने प्रवेश करून पाणी व सँडविच मागवले. साडेपाचच्या सुमारास ज्याच्या नावाने रूम बुक करण्यात आली तो अशोक दळवी बाहेर गेला. बाहेर जाताना तो अतिशय घाईत गेला. सात वाजले तरी काहीही प्रतिसाद न मिळाल्याने व दळवी ज्या पद्धतीने बाहेर पडला हे पाहून संशय मनात आल्याने रूमचा दरवाजा ठोठावला. पण रिस्पॉन्स न आल्याने दुसऱ्या किल्लीने तो उघडून पाहिले असता महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. या बाबत माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय घुमाळ यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 10:24 pm