पनवेल: खारघर वसाहतीमधील उद्याने जिवघेणी ठरत आहेत. तीन दिवसांपुर्वी रविवारी सायंकाळी खारघरमधील सेक्टर १२ येथील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका चार वर्षांच्या बालिकेला उद्यानातील बाकाच्या दूरवस्थेमुळे प्राण गमवावे लागले. ऋक्षा प्रकाश विश्वकर्मा असे या बालिकेचे नाव आहे.

खारघर वसाहतीमधील सेक्टर १२ परिसरातील गिरीराज सोसायटीत ऋक्षा हीचे वडील सूरक्षारक्षकाचे काम करतात. ऋक्षा वडिलांसोबत उद्यानात खेळत होती. तीला दम लागल्याने ती एका बाकावर बसली. ती बसलेले बाक तीच्या अंगावर कलंडून पडल्याने तीचा मृत्यू झाला. कसेबसे वडीलांनी ऋक्षा हीच्या अंगावर पडलेला बाक उचलला परंतू तोपर्यंत तीचा मृत्यू झाला होता. या उद्यानात वाढलेले रान सुद्धा कापण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वी माजी नगरसेविका लीना गरड यांचा नगरसेवक निधी संबंधित बाक बसविण्यासाठी वापरण्यात आला होता. या उद्यानात असे चार बाक बसविण्यात आले आहेत.

Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
mumbai, Two Workers Die, One Critical, Falling into Toilet Tank, malad, pimpripada, Construction Site, marathi news, malad news, mumbai news, workers fell tank in malad
मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
Mumbai, Fire Breaks Out, Government Building bandra, Fire Government Building bandra, bandra news, fire news, fire in bandra, mumbai news, marathi news, fire brigade, firefighters,
वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

हेही वाचा >>>नवी मुंबई पालिकेकडून सार्वजनिक गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ

हेही वाचा >>>ऐरोलीतील पोस्टाचे स्वयंचलित पार्सल हब केंद्र कधी?

पालिकेने हे बाक बसविण्याचे काम केले होते. मात्र बाकाच्या दूरवस्थेमुळे खारघरमध्ये एकच खळबळ माजली. तीन दिवसांपूर्वी बालिकेला उद्यानात प्राण गमवावे लागल्याच्या घटनेने खारघरमधील राजकारण तापले आहे. खारघरचा राजा गणेश चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पनवेल पालिकेच्या प्रशासनाने संबंधित उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बाक बसविले हे महत्वाचे नाही मात्र नागरिकांच्या सोयीसाठी बसविलेले बाक नंतर जिवघेणे कसे ठरू शकतात असा प्रश्न पडतो. वेळीच डागडुजी केली असती तर ही वेळ आली नसती असे या उद्यानात फिरणा-या नागरिकांचे मत आहे.