नवी मुंबई : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शनिवारी बेलापूर किल्याचा बुरूज ढासळला असल्याचा आरोप करीत कंत्राटदाराचे काम रद्द करून संबंधित कामावर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी केली. त्यांनी सिडको मुख्यालयासमोर आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किल्ला दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटदाराचे काम रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांनी निष्काळजी केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी यावेळी केली. यापुढील संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने करावे अशी मागणी सौरभ काळे यांनी केली तर येत्या ४८ तासांत कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा तेजस शिंदे यांनी दिला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancel contract suspend officers ssh
First published on: 15-06-2021 at 01:57 IST