पनवेल : नवी मुंबई, पनवेल परिसरातील मित्रमंडळी चारधाम यात्रेसाठी जात असताना त्यांच्या बसला दोन दिवसांपूर्वी अपघात होत यातील एक जणांचा मृत्यू झाला आहे. संदेश भगत असे या तरुणाचे नाव असून तो नवेल तालुक्यातील आंबिवली गावातील आहे. त्याच्या अपघाती मृत्यूबाबत संदेशच्या आई वडिलांना कल्पना देण्यात आली नसल्याने तो परत येण्याकडे त्यांचे डोळे लागून आहेत.संदेशचा मृतदेह आणण्यासाठी त्याचा भाऊ व मित्र उत्तराखंड येथे गेले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत ते परत येणे अपेक्षीत होते. मात्र संध्याकाळ पर्यंत ते आलेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदेश नेरुळ येथील एका वाहन विक्री दालनात काम करीत होतो. तो व त्याचे सहकारी मित्र चारधामच्या देवभूमीत यात्रेसाठी गेले होते. सीवूडस येथील एका ट्रॅव्हल कंपनीने १८ ते ३१ जुलै दरम्यान या यात्रेचे आयोजन केले होते. संदेश व इतर मित्र रेल्वेने दिल्लीपर्यंत प्रवास करीत पुढील प्रवास एका खासगी बसने करीत होते. या बसमध्ये एकूण ३२ जण असल्याचे समजते.

उत्तराखंडातील प्रवास सुरू असताना खोल दरीवरील अरुंद रस्त्यावरून बस जात असताना हा अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला व इतर एकजण जखमी आहे. या यात्रेचे आयोजन केलेले हरिष घरत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संदशे यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे सांगत आंम्ही तेथेच असून एकजणावर उपचार सुरू असून त्याला गरुवारी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. इतर सर्वजण सुखरुप असून ते नवी मुंबईत परतले असल्याचे सांगितले.

संदशे यांच्या बसला अपघात झाला आहे, याबाबत त्याच्या आई वडिलांना नातेवाईकांनी माहीती दिली असून तो सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या परतीकडे तिचे डोळे लागून आहेत. मात्र अजून ते परत का आले नाहीत अशी विचारणा त्या करीत असल्याचे आंबिवलीचे ग्रामपंचायत सदस्य अरुण जळे यांनी सांगितले.

आईचा आधार

संदेश हा नवी मुंबईतील नेरुळ येथील एका वाहनविक्रीच्या दालनात काम करीत होता. त्याच्या आईचा मासेविक्रीचा व्यवसाय असून तो त्याचे काम सांभाळून आईलाही व्यवसायत मदत करीत होता. तिला व्यवसायाच्या ठिकाणी सोडण्यासाठी व आणण्यासाठी त्यांने एक रिक्षाही घेतली आहे. त्याच्या आईसाठी तो मोठा आधार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान या अपघातात जखमी असलेल्या आणखी एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. हा तरुण शीळफाटा येथील राहणारा आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death in an accident while traveling on chardham yatra amy
First published on: 20-07-2022 at 09:36 IST