घाऊक तसेच किरकोळ बाजारात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये गगनाला भिडलेल्या वाटण्याचा आता स्वस्ताईचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात वाटण्याची आवक वाढली असून दर कमी होत आहेत. मागील आठवड्यात प्रतिकिलो ३०-३२ रुपयांवरून आता १६-२० रुपयांवर विक्री होत आहेत.त्यामुळे किरकोळ बाजारात ही वाटाणा आवाक्यात आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : खोपटा पुलावर अवजड वाहनांचे पार्किंग; प्रवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी

साधारण नोव्हेंबर महिन्यापर्यत हिरवा वाटाण्याची अवाक खूप तुरळक प्रमाणात होत असते. या वाटाण्याच्या मंदीच्या हंगामात आवक कमी असल्याने त्याचे भाव गगनाला भिडत असतात. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वाटण्याने १८०ते दोनशे पार केली होती. पंरतु बाजारात हिरव्या वाटण्याचा हंगाम सुरू होत असून आवक वाढली आहे. शिवाय डिसेंबरमध्ये वाटण्याचा खरा हंगाम सुरू होतो तर वर्षभर तुरळक वाटाणा दाखल होत असतो. बाजार समितीत मध्य प्रदेशातून हिरवा वाटाण्याची आवक होते. शुक्रवारी एपीएमसीत ५०-५५ गाड्या दाखल झाल्या असून ४२५५ क्विंटल आवक झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून एपीएमसी बाजारात वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सहाजिक घाऊक बाजारात वाटाणा स्वस्तात उपलब्ध झाल्याने पुढील कालावधीत किरकोळ बाजारात वाटाण्याचे भाव कमी होणार. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठया प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होत असतो त्यामुळे बाजारभावात घसरण होते.

हेही वाचा- नवी मुंबई : ‘ड्राय वेस्ट बँक’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार

टोमॅटो, वांगी, कोबी,फ्लावर दरात घसरण

एपीएमसी बाजारात वाटण्याच्या दरात घसरण झाल्याने इतर भाज्यांचे दर ही घसरले आहेत असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून आधी १०-१२रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता ७-८रुपयांनी उपलब्ध असून ३ हजार ४२ क्विंटल आवक झाली आहे. वांगी ७-८रुपयांनी उपलब्ध असून ३६२ क्विंटल आवक झाली आहे. कोबी १४९१ क्विंटल तर फ्लावर १७०० क्विंटल आवक झाली असून प्रतिकिलो ४-५ रुपयांनी उपलब्ध आहे.