उरण : दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून उरण तालुक्यात रिमझिम बरसण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पेरणी केलेल्या भाताच्या रोपांना हवेतील वातावरण व पावसाचे पाणी पोषक ठरणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्याचा त्रास हा वाहनचालकांना, नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षी पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला भात शेतीत पेरणी केलेले भात बियाणे वाया जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत होती. त्यात रविवारी उरण तालुक्यात रात्रीच्या सुमारास रिमझिम पावसाने सुरुवात केली. त्यामुळे हवेतील वातावरण व पावसाचे पाणी हे भात शेतीला पोषक ठरणार आहे. एकंदरीत पेरणी केलेल्या भाताच्या रोपांची जलद गतीने वाढ होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drizzle uranus rain water roads in the area including jnpt port amy
First published on: 21-06-2022 at 00:01 IST