उरण येथील गेल इंडियाच्या वायू वाहिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याची जाहीर सुनावणी शुक्रवारी जेएनपीटी च्या कामगार वसाहतीच्या ब हुद्देशीय सभागृहात घेण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या वायू वहिनीला देण्यास तीव्र विरोध केला आहे.त्याचप्रमाणे पिकत्या जमिनीतून वहिनी न नेता तिचा मार्ग बद्दलण्याचीही मागणी करण्यात आली आहे. परदेशातून बंदरामार्गे जहाजातून येणाऱ्या आयात वायू वाहून नेण्यासाठी जेएनपीटी ते अलिबाग तालुक्यातील उसर अशी उरण, पेण व अलिबाग व पनवेल या चार तालुक्यातून गेलची वायू वाहिनी टाकण्यात येणार आहे. या वाहिनीसाठी खोपटे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केली जाणार आहे. या वाहिनीच्या भूसंपदनाला प्रखर विरोध केला आहे. यावेळी भूसंपदानाच्या प्रक्रियांची जबाबदारी असलेल्या उप जिल्हाधिकारी अश्विनी पाटील व गेल इंडियाचे संदीप कुमार मुख्य बांधकाम अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. या सुनावणीच्या दरम्यान शेतकऱ्यांनी वायू वाहिनी शेत जमिनी ऐवजी रस्त्या लगत च्या जमिनीतून नेण्यात यावी अशीही सूचना केली आहे.

काय मिळणार भूसंपदानाच्या बदल्यात शेतकऱ्यांची ३० मीटर रुंदीची जमीन यासाठी संपादीत करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पाईपलाईन कायद्याचा वापर केला जाणार असून शेतकऱ्यांना बाजार भावाच्या अवघी १० टक्के रक्कम(मोबदला) दिला जाणार आहे. त्याचवेळी या जमिनीचा शेतीसाठी वापर करता येणार असल्याचा।दावा केला आहे. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांवर अनेक प्रकारच्या अटी लादून जमिनीच्या वापरा पासून शेतकऱ्यांना रोखलं जात असल्याचा आज पर्यंतचा अनुभव शेतकऱ्यांनी कथित केला. तर भूसंपदानाच्या बदल्यात या कायद्यात पुनवर्सन म्हणून रोजगार दिला जाणार नाही.

pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

शेतकऱ्यांना लेखी उत्तरे हवीत
उरण मधील शेतकऱ्यांच्या वतीने गेलच्या वहिनीच्या भूसंपदानाच्या प्रक्रियेला विरोध केला म्हणून लेखी सुरूपात हरकती दिल्या आहेत. या हरकतीना शासनाने लेखी उत्तर देण्याची मागणी केली असून भूसंपदान अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आहे.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपदान
उरणच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता भूसंपदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये केंद्र सरकारने दिल्ली वरून वायू वाहिनीची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. मात्र या वाहिनी करीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी संजय ठाकूर,गोरख ठाकूर,अभिजत पाटील, राजू म्हात्रे, उन्नती गावंड,नरेश ठाकूर,रणजित भगत आदींनी या सुनावणी दरम्यान आपला विरोध दर्शविला.