पनवेलच्या बाजारात सध्या रानमेव्याचा घमघमाट सुटला आहे. एप्रिलच्या प्रारंभीच ताडगोळे, फणस, कैऱ्या, आंबे, जांभळे, आवळे, करवंदे आणि राजना या जंगलातील फळांच्या विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. तालुक्यातील आदिवासी हा रानमेवा टोपल्या भरून बाजारात आणतात. सध्या रानमेव्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ आहे.
- ताडगोळे- १०० रुपये डझन
- फणसाचे गरे- १७५ रुपयांत ५५ नग
- कैरी- २० रुपये पाव किलो
- जांभळे- ५० नग ६० रुपये
- आवळे- ७० नगांना २० रुपये
- जाम- १२ नग ४५ रुपये
- करवंद- २० रुपयांना ५५ नग
- राजना- २४० रुपये किलो दर आहे. एका किलोत अंदाजे ६० नग.
