पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरकमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘ग्रंथाली’तर्फे ‘पॉप्युलरचे अंतरंग’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. ८ डिसेंबर रोजी मुंबईत दादर येथे होणाऱ्या एका विशेष समारंभात प्रसिद्ध लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पॉप्युलर प्रकाशनाचे सर्वेसर्वा रामदास भटकळ यांनी पहिल्या वीस वर्षांतील लेखकांचा आढावा ग्रंथात घेतला आहे. मृदुला जोशी, अंजली कीर्तने, शुभांगी पांगे, अस्मिता मोहिते या सहसंपादकांचे लेख आहेत. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी (नाटक), विचारवंत व लेखक रंगनाथ पठारे (कादंबरी), वसंत पाटणकर (समीक्षा), ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर (चरित्र व आत्मचरित्र), व्यंगचित्रकार वसंत सरवटे (पुस्तक मांडणी, मुखपृष्ठ) यांच्या मुलाखती आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
‘ग्रंथाली’ ‘पॉप्युलरचे अंतरंग’ उलगडणार!
‘पॉप्युलरचे अंतरंग’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 01-12-2015 at 08:20 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Granthali publishing book on popular prakashan