उरण : येथील ‘रयत शिक्षण संस्थे ’ च्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत कनिष्ठ महाविद्यलयामध्ये शालांत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा अधिक समृद्ध व्हाव्यात व अभ्यासक्रमातल्या संकल्पना अधिक सुस्पष्ट व्हाव्यात यासाठी फिरत्या  कार्यशाळेचे आयोजन पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. 

जयश्री सानप मॅडम व गणेश संसारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना प्रतिकृती व  व्हिडीओंच्या माध्यमातून ( दृकश्राव्य माध्यम)  माध्यमातून स्पष्ट केल्या. या फिरत्या मार्गदर्शन प्रयोगशाळेत विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. डब्ल्यु.एन.एस.कंपनीच्या वतीने उपलब्ध असणाऱ्या पेजवरील प्रश्नावलींच्या माध्यमातून रेश्मा सोनवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली काही स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना या विषयाचे धडे दिले. सानप व  संसारे सर आणि रेशमा सोनवणे  यांच्यासह सेवा सहयोग फाउंडेशनच्या इतर सर्व स्वयंसेवकांनी या फिरत्या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साक्षर करून सायबर क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण बाबींविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी दिली.  कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी  विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे, ज्योती माळी ,वृषाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर ,योगिता पाटील, प्रसन्न ठाकूर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर आदींनी सहभाग होता.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान