शुक्रवारी नेहमीच सायन पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने नेहमी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. परंतू आज ( ता.२१) मानखुर्द ते वाशी टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याते पाहायला मिळाली. शनिवार ,रविवारला जोडून सोमवारी दिवाळीची सुट्टी या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुणे कडे जाणाऱ्या वाशी तसेच ऐरोली मुलुंड उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे जास्तीत जास्त १० मिनिटाच्या रस्त्यासाठी १ तासाहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. त्यातच मुबईच्या दिशेला जाणारी एक गाडी मध्येच पुलावर बंद पडल्याने या वाहतूककोंडीत अधिक भर पडली होती.

हेही वाचा >>>नवी मुंबई : खासगी बसमध्ये अग्निशमन यंत्रणेचे तीनतेरा

एकीकडे मानखुर्द उड्डाणपुलापासून वाशीकडे जाणाऱ्या खाडीपूल मार्गापर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.त्यामुळे या मार्गावर अतिशय संथगतीने वाहतूक सुरु होती. तर अनेक वेळा वाहतूक ठप्प् झाल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या मार्गावर नेहमीच सायंकाळच्यावेळी नेहमी गर्दी पाहायला मिळते.परंतू शुक्रवारी सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच टोलनाक्यावर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक पोलीसांचीही मोठी तारांबळ उडाली होती. प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी या मार्गावर मुंबईबाहेर जाणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतू यावेळी दिवाळीच्या मुलांना लागलेल्या सुटट्या यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. शुक्रवारी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी सर्वच मुंबईबाहेर जाणाऱ्या मार्गावर गर्दी होती. नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज् असताना वाहनांची प्रचंड संख्या यामुळे पोलीसांनाही वाहतूककोंडी सोडवताना मोठी अडचण येत होती.

हेही वाचा >>>उरण : सिडकोने जमिनी न घेता नवी मुंबई सेझच्या जमिनी परत घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

मुंबईकडून वाशीकडे जाण्यासाठी वाहनाने प्रवास करत असताना मानखुर्द सिग्नलपासूनच मोठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सर्व मार्गावर अतिशय संथ गतीने वाहतूक सुरु होती. अनेकवेळा एका जागेवर बराचवेळ थांबावे लागत होते. त्यामुळे दिवाळीची शाळांना सुट्टी लागल्याने कुटुंबासह गावी निघालो असल्याचे सांगीतले..-संजय कोळखे, वाहनचालक