प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोने २६ जानेवारीला सहा हजार घरांची विक्री प्रक्रिया राबवली होती. आठ महिन्यांनंतर तळोजा, खारघर, द्रोणागिरी आणि कळंबोली येथे ४,१५८ घरांचा गणेशोत्सव धमाका जाहीर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ३,७५४ आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४०४  घरांची विक्री बुधवारपासून सुरू होणार आहे. या सदनिकांसह २४५  गाळे आणि सहा कार्यालये भाडेतत्त्वावर दिली जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या ‘सर्वासाठी घरे’ उपक्रमांअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने एक लाख सहा हजार घरांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी वेगात घरांचे बांधकाम केले जात आहे. अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी ही घरे बांधली जात असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सिडकोने गणेश चतुर्थीचे औचित्य साधून विविध गृहसंकुलांतील सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी महागृह निर्मितीला चालना दिली असून त्यामुळे सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रीमाइसेस) विविध योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना विक्री करत आहे.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
MPSC Mantra Non Gazetted Services Joint Prelims Exam Analysis of geography questions
MPSC मंत्र: अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; भूगोल प्रश्न विश्लेषण
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये, तर अनुदानाची रक्कम अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गृहयोजनांच्या सविस्तर माहितीकरिता  https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.