आरटीओकडून कारवाई, चार दुचाकी जप्त

mumbai municipal corporation seizes six motor garages for non payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटार गॅरेजवर जप्तीच मालमत्ता करवसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाईला सुरुवात
Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!

नवी मुंबई : चारचाकी, बसमधून अवैध प्रवासी व माल वाहतूक होत असल्याने आरटीओकडून कारवाई केली जाते. मात्र आता शहरात अ‍ॅपच्या माधमातून दुचाकींवरून प्रवासी वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून एक मोहीम हाती घेत या प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. यात चार दुचाकी जप्तही करण्यात आल्या आहेत.

सध्या ओला, उबेरसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी सेवा दिली जाते. याच धर्तीवर रॅपिडो नावाचे एक अ‍ॅप असून शहरांतर्गत प्रवाससाठी दुचाकी व टॅक्सी प्रवासी सेवा देत आहेत. मात्र मोटार वाहन कायद्याअंतर्गत दुचाकीवरून प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. असे असताना नवी मुंबईतही आशाच प्रकार बेकायदा दुचाकीवरून प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागाला मिळाली होती.

ही वाहतूक अवैध असल्याने परिवहन विभागाकडून एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. यात ही वाहतूक कुठून कशी व कोण करते याबाबतची माहिती घेत त्यांनी त्यावर कारवाई केली.

या रॅपिडो दुचाकी प्रवासी सेवेचा शोध घेतला असता, नेरुळ येथील वंडर पार्क आणि वाशी विभागात चार दुचाकी अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळल्या. आरटीओकडून आशा वाहनांवर मोटार वाहन कायदा ६६, १९२ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ४० ते ५० दिवसांकरिता त्यांचे आरसी परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच या वाहनधारकांना न्यायालयात पाठविले जाणार आहे.

शहरात रॅपिडो बाईक या अ‍ॅपच्या माध्यमातून दुचाकीवरून अवैध प्रवासी वाहतूक सुरू होती.  शुक्रवारी दुचाकीवरून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असलेल्या दुचाकींवर कारवाई केली असून, त्यांचा आरसी परवाना ४० ते ५० दिवसांकरिता निलंबित करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईकरिता न्यायालयात पाठवण्यात येणार आहे.  हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, वाशी आरटीओ