पनवेल : मराठी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्राथमिक शाळेने तालुक्यातील २४० शाळांना स्पर्धेत मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. शासनाने राबविलेल्या शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबविते यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली. विविध उपक्रमांची माहिती संकलित करुन शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या अॅपवर ही माहिती दिल्यानंतर पालिकेच्या शाळेने तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पुढील टप्पा हा जिल्हास्तरीय असून त्यानंतर राज्य स्तरीय स्पर्धेसाठी पनवेलची शाळा निवडली जाईल का यासाठी पालिकेचे प्रयत्न सूरु आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in