उरण: येथील कलाप्रेमींनी रेखाटलेल्या रांगोळीमधून हुबेहूब व्यक्ती चित्र साकारले आहेत. दिवाळीनिमित्त आयोजित हे प्रदर्शन १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आठवडाभर आहे. या रांगोळी प्रदर्शनात क्रिकेटपटू, शतकांचा विक्रमवीर विराट कोहली, नुकताच प्रदर्शित झालेला श्यामची आई चित्रपटाचा पोस्टर, वारकरी , कष्टकरी महिला यांच्या कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत. एन आय हायस्कुल उरण येथे हे प्रदर्शन रविवार पर्यत असणार आहे.

कला ही बुद्धीची देवता आहे, याच कलेच्या माध्यमातून आपले कलागुण समोर आणण्यासाठी उरण येथील कलाप्रेमींनी ‘रंगवल्ली कला दर्शन’ मार्फत रांगोळी प्रदर्शन भरविले आहे. उरण शहरात भरविण्यात आलेल्या या रांगोळी प्रदर्शनात शिक्षक, चित्रकार, हौशी कलाकार यांनी सहभाग घेतला आहे. तर, रांगोळी प्रदर्शनाच्या निमित्ताने उरण शहरात आयोजित करण्यात आलेले रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून कलेचा सुंदर आविष्कार अनुभवता आला आहे.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’

हेही वाचा… तब्बल २७ टन फटाके व फुलांचा कचरा जमा, लक्ष्मीपूजनानंतर सोमवार सकाळपर्यंत नवी मुंबई पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

यामध्ये, फाईनआर्टचे शिक्षण घेतलेल्या सिद्धार्थ नागवेकर, स्वप्नाली मणचेकर , शिल्पकार सर्पमित्र आणि चित्रकार राजेश नागवेकर नंदकुमार साळवी या ७८ वर्षीय निवृत्त कला शिक्षकाने ९ बाय ६ फुटाचा सुंदर गालिचा टाकला आहे. आतिष मंचेकर, स्वप्नाली मंचेकर,सत्या कडू,कला शिक्षक संतोष पाटील, संतोष पनवेलकर, नागेश नागवेकर, सिध्दार्थ नागवेकर या कलाकारांनी या रांगोळ्या साकारल्या आहेत. या माध्यमातून उरण मधील कलाकारांनी कलेची आणि खासकरून दीपावलीच्या रांगोळी प्रदर्शनाची परंपरा कायम ठेवली आहे.