नवी मुंबई: नवी मुंबई शहरात महापे औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तोडण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू आहे. काँक्रिटीकरण करण्यासाठी गरज नसताना २८२९  झाडे तोडली जाणार असल्याने याबाबत पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. नवी मुंबईत दिघा परिसरात झोपडपट्टी मेळाव्याप्रसंगी  एमआयडीसीच्या वृक्षतोडीबाबतच्या कामाबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसी ही कायद्यानुसारच काम करते. एक झाड तोडायचे असेल तरी संबंधित आस्थापनांकडून परवानगी घेऊनच काम करते. एमआयडीसी कोणतेही काम कायदा धाब्यावर बसवून करत नाही, असे वक्तव्य देसाई यांनी केले. यामुळे एमआयडीसीतील २८२९ झाडे तोडली जाणार हे स्पष्ट आहे.

महापे औद्योगिक वसाहतीमधील बेसुमार वृक्षकत्तल आणि प्रत्यारोपण परवानगी स्थगिती करण्याची मागणी वारंवार पर्यावरणप्रेमींनी केली असून जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे. एमआयडीसी प्रशासनाने टीटीसी इंडस्ट्रियल विभागात महापे येथील कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्या कार्यालयामार्फत वृक्ष अधिकारी या अधिकाराने रस्त्याच्या क्राँकिटीकरणासाठी सुमारे २,८२९ पैकी ६१७ झाडे तोडणे व २२१२ झाडे प्रत्यारोपण करण्यासाठी सुधारित जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

या कामामध्ये रस्ता रुंदीकरण अथवा अन्य तत्सम स्वरूपाचे काम करायचे नसल्याने झाडे बाधित होण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही प्रशासन मात्र झाडे तोडण्यावर ठाम असल्याचे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असताना उद्योगमंत्री देसाई यांनी एमआयडीची रस्त्याच्या कामासाठी झाडे तोडणार असल्याबाबत विचारले असता एमआयम्डीसी हजारो झाडे सोडा एक झाडही नियमाच्या व  कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तोडणार नसल्याचे सांगितले. 

देसाई यांनी आजच्या नवी मुंबईतील झोपडपट्टी मेळाव्यात मुंबई ठाणे शहराच्या धर्तीवर नवी मुंबईतील झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास करणार असून झोपडपट्टीतील कुटुंबांना भक्कम व पक्की घरे मिळावीत यासाठी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अहवाल मंत्रिमंडळाला सादर करणार असल्याचे आश्वासन  देसाई यांनी दिले.

एमआयडीसी नवी मुंबईतील झाडे तोडण्यासाठी ठाण्याच्या वृत्तपत्रात जाहिरात देते व स्थानिक नवी मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात देत नाही. त्यामुळे एमआयम्डीसी नियम धाब्यावर बसवते. वृक्ष वाचवण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून हरित लवाद व वेळ पडल्यास न्यायालयातही धाव घेणार आहोत.

बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवाभावी संस्था