लशीसाठीही आळस ! ; महापालिकेकडे ८० हजार लसमात्रा शिल्लक

दिवाळी असल्याने लस घेतल्यावर ताप, कणकणी जाणवते. त्यामुळे आता नको, नंतर घेऊ असा प्रतिसाद मिळत आहे.

नवी मुंबई : गेल्या महिन्यापर्यंत लसीकरण केंद्रांबाहेरील असलेल्या नागरिकांच्या रांगा आता गायब झाल्या आहेत. करोना परिस्थिती आटोक्यात आल्याने लस घेण्यासाठी नागरिक उत्सुक नाहीत. त्यात दिवाळी असल्याने आता नको अशी मानसिकता असल्याने लसीकरणास कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महापालिकेकडे ८० हजार लसमात्रा शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे ‘लस घ्या लस’ असे आवाहन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

नवी मुंबईत १८ वर्षांवरील लसपात्र नागरिकांची संख्या ११ लाख ७ हजार असून आतापर्यंत पहिली मात्रा ११ लाख २५ हजार ६५३ जणांनी घेतली आहे. तर दुसरी मात्रा ही ६ लाख १६ हजार ८५४ जणांनी घेतली आहे. नवी मुंबईत पहिल्या लसमात्रेचे लसीकरण पूर्ण झाल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना किमान एकमात्रेचे लसकवच मिळाले आहे. मात्र दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण हे ५५ टक्केपर्यंतच आहे. गेले दोन आठवडे यात मोठी वाढ होत नसल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला लस घेण्यासाठी तासन्तास रांगा लावून लस घेतली जात होती, आता पालिकेकडे ७० हजार लसमात्रा शिल्लक आहेत. परंतु लस घेण्यासाठी नागरिक येत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपल्या कॉल सेंटरवरून दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र नागरिकांशी सपर्क सुरू केला आहे. दिवाळी असल्याने लस घेतल्यावर ताप, कणकणी जाणवते. त्यामुळे आता नको, नंतर घेऊ असा प्रतिसाद मिळत आहे.

करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे. निर्बंध हटवले म्हणजे करोना गेला असा समज निर्माण करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आपली सुरक्षा आपल्या हातीही बाब लक्षात घेऊन लस घ्यावी. दिवाळीनंतर लसीकरणावर अधिक भर देण्यात येणार आहे.

अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

२८ नवे रुग्ण

शहरात गेली काही दिवस करोना रुग्णांत वाढ होत होती. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. मंगळवारी शहरात २८ नवे करोना रुग्ण सापडले असून एक जणाचा मृत्यू झाला आहे.  करोना प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना करोना नियमांचा विसर पडलेला दिसत आहे. परिणामी शहरात करोना रुग्णांत काहीशी वाढ होत आहे.

दहा दिवसांतील लसीकरण

* २३ ऑक्टोबर : ६९३४

* २४ ऑक्टोबर  : २०४२

* २५ ऑक्टोबर  : ५२५०

* २६ ऑक्टोबर  : ४८४८

* २७ ऑक्टोबर  : ४४८४

* २८ ऑक्टोबर  : ३८१२

* २९ ऑक्टोबर  : ३७८१

* ३० ऑक्टोबर  : ५०२५

* ३१ ऑक्टोबर  : १०१७

* ०१ नोव्हेंबर : १०१७

एकूण लसीकरण

* पहिली मात्रा : ११,२५,६५३

* दुसरी मात्रा :  ६,१६८५४

सशुल्क लसीकरण

* कोव्हिशिल्ड : ९,५९,०३०

* कोव्हॅक्सिन : १,०१,९००

* शिल्लक लसमात्रा : ७०,०००

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navi mumbai municipal corporation 80000 vaccines remain due to low response zws

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या