नवी मुंबई : भाजी फळे अगदी छोट्या गावात तालुक्यात दही सुद्धा  फिरून विकणारे फेरीवाली सर्वत्र आढळून येतात.एवढेच काय  कपड्यावर भांडी विकणारी भोवारीण आजही ग्रामीण भागात आढळून येते. मात्र उरण पनवेल परिसरात अशाच पद्धतीने मद्य विकले जाते.वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे सत्य आहे असाच फिरून मद्य विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून त्याच्या कडून २१ देशी दारूच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत.

किशन  भिमलाल नायक असे आरोपीचे नाव आहे. जेएनपीटी बंदरामुळे  उरण परिसर भागात रोज हजारो ट्रक कंटेनरची ये जा होत असते. पूर्ण भारतातून येणाऱ्या या ट्रकचालक मदतनीस यांना दारू पिण्याची हुक्की येते मात्र कुठे मिळेल हे माहिती नसते. अशात ट्रक वा कंटेनर सोडून जाणेही अनेकदा शक्य होत नाही. नेमकी हीच गरज ओळखून दारू विकणाऱ्या  फिरस्तीचा धंदा तेजीत चालतो. ज्यांना दारू हवी असे लोक आणि जे दारू विकतात हे दोन्ही घटक बरोब्बर एकमेकांना ओळखतात आणि दोघांचीही गरज पूर्ण होते. अशाच पद्धतीने नायक हा दारू विकत होता. त्याच्या बाबत न्हावा पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र बोराटे यांना माहिती मिळाली. बोराटे यांनी पोलिसी पद्धतीने त्याचा ठाव ठिकाणा शोधला. नायकला बोराटे यांनी स्कँनिंग रोड वरील एका हॉटेल परिसरात शोधून काढत पकडले व थेट पोलीस ठाण्यात आणले. त्याची अंगझडती घेतली असता संत्रा, जीएम. बडीसोप अशा देशी दारूच्या २१ बाटल्या आढळून आल्या. हा सातशे पस्तीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून त्याच्या विरोधात बेकायदा दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

What Raj Thackeray Said About Hitler?
राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”
how scam callers find numbers
स्कॅम कॉल करणाऱ्यांना तुमचा नंबर कसा मिळतो? स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ही’ माहिती जाणून घ्या…
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?