नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांच्या कलेला वाव मिळावा यासाठी यंदाही ‘प्रतिमा नवी मुंबईची’ ही छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पध्रेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजेच दिघा ते सीबीडी-बेलापूर भागांतील छायाचित्रकारांना प्रवेश असून त्यासाठी विषयांचे बंधन नाही. स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या नवी मुंबईची वैशिष्टय़े टिपणारी बेस्ट ऑफ नवी मुंबई अशी किमान एक व जास्तीत जास्त ५ स्मार्ट छायाचित्रे ७ डिसेंबपर्यंत सीबीडी बेलापूर येथील महापालिका मुख्यालयील जनंसपर्क विभागात जमा करावयची आहेत. स्पध्रेकरिता प्रवेश शुल्क नसून स्पध्रेतील विजेत्या ८ व्यावसायिक छायाचित्रकारास प्रत्येकी २० हजार तसेच हौशी छायाचित्रकारांस प्रत्येकी १० हजार रुपयांची पारितोषिके सन्मानचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत. ही सर्वोत्तम १२ छायाचित्रे नवी मुंबई महानगरपालिका दिनदर्शिका २०१६मध्ये झळकणार आहेत. छायाचित्रण स्पध्रेत सहभाग घेण्याकरिताचे प्रवेश अर्ज नियम व अटींसह महानगरपालिकेची आठही विभाग कार्यालये तसेच विष्णुदास भावे नाटय़गृह आणि महापालिका मुख्यालयातील जनसंपर्क विभागात उपलब्ध असून ते http://www.nmmconline.com , <http://www.nmmconline.com/&gt;   येथेही उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी २७५६७१७४ व ९३२०३०७२२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.