रबाळे एमआयडीसी परिसरातील लॉजवर बुधवारी रात्री नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या पाच मुलीची सुटका केली. या वेळी दोघांना अटक करण्यात आले. जीवन रजत आणि सुधाकर पुजारी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रबाळे एमआयडीसी परिसरात असलेल्या संजराज लॉजमध्ये शरीर विक्रयासाठी काही मुली आणल्या असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने लॉजवर छापा टाकला. ताब्यात घेण्यात आलेल्या या पाच मुलींपैकी तिघी अल्पवयीन असल्याचे आढळून आले. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिंटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sansraj lodge in midc rabale raided by police
First published on: 06-02-2016 at 00:53 IST