पनवेल ः जुन्या पनवेल पूणे महामार्गावरील पळस्पेफाटा येथील लेडीज सर्व्हीस बारच्या व्यवस्थापकाला धमकाविणाऱ्या बोगस पोलिसाला पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. या ३१ वर्षीय बोगस पोलिसाचे नाव सलमान मुलाणी असून तो मूळचा पुणे चाकण येथील राहणार आहे. सलमान याची मैत्रिण याच सिंगरमधून या बारमध्ये काम करते. तीला व्यवस्थापकांनी कामावरुन काढून टाकल्याने त्याने मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी हा बनाव केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

कोणत्या बॅचला सलमान पोलीस झाला याचे उत्तर तो न देऊ शकल्याने त्याचा बनाव पोलिसांना कळाला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सलमान याच्याविरोधात रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी रात्री आठ वाजता पळस्पे फाटा येथील गोल्ड डिगर या लेडीज ऑक्रेस्ट्रा या बारमध्ये सलमान हा पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात बारचे व्यवस्थापक सूरेश गुप्ता यांच्याकडे आला. सलमानने सूरेशला धमकावले. सलमानच्या मैत्रिणीला कामावरुन का काढले याचा जाब विचारताना सलमान याने सूरेशला शिविगाळ करुन सूरशेच्या कानफाटीत मारली. सलमानने सूरेशला मारताना त्याच्या मैत्रिणीला लगेच कामावर परत घेऊन तीच्या पगाराचा हिशेब देण्याचा तगादा लावला. लगेच त्या मैत्रिणीचे पगाराचे पैसे दिले नाही, तर सूरेशला हॉटेल बंद करुन टाकण्याची धमकीदेखील दिल्याचे सूरेशने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अखेर मार खाऊन संतापलेल्या सूरेशनेसुद्धा सलमानची तक्रार करण्यासाठी पनवेल शहर पोलिसांकडे संपर्क साधल्यावर तेथे काही मिनिटांतच पोहोचले. स्थानिक पोलिसांनी सलमानला पोलिसांच्या खाकी वर्दीमध्ये पाहून सावध पवित्रा घेतला. पोलीस गणवेशात असलेल्या सलमानच्या खांद्यावरील दोन तारका पाहून प्रथमदर्शी सलमान सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचा समज पोलिसांना झाला. त्याच्या गणवेशावर महाराष्ट्र पोलीस असल्याचा बॅच होता. त्याच्या बॅचच्या शेजारी लाल व निळ्या रंगाची रिबिन, डाव्या हाताच्या दंडावर महाराष्ट्र पोलीसचा लोगो, कमरेला लाल रंगाचा बेल्ट, पायात लाल रंगाचे बूट असा पेहराव पाहून काही क्षण चौकशीसाठी आलेल्या पोलिसांनी सुरुवातीला शांतपणे चौकशी सुरु केली. अखेर या स्थानिक पोलिसांनी सलमानला पनवेल शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

mumbai, Khar subway, bridge on the Khar subway , residents opposed proposed bridge, residents near khar, residents of khar subway, khar subway news, mumbai news,
मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
road work contractor marathi news, mumbai municipal corporation marathi news
मुंबई: शहर भागातील कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्याप दंड वसुली नाही, एक महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

हेही वाचा – विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी सलमानला कुठल्या पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. त्याची पदश्रेणी कोणती, तो कोणत्या साली म्हणजे कोणत्या बॅचचा पोलीस झाला याची माहिती विचारल्यावर सलमानचा गोंधळ उडाला. सलमानने तो २९४ हा बॅच सांगितल्यामुळे पोलीस अधिकारी लभडे यांना तो पोलीस नसल्याची खात्री पटली. आतापर्यंत राज्यातील १२० पर्यंत बॅच झाल्यामुळे सलमान खोटी उत्तरे पोलिसांना देत होता. काही मिनिटांत खऱ्या पोलिसांनी खोट्या बोगस सलमानचा पर्दाफाश केला. सलमान हा पूणे चाकण येथील माणिक चौकातील यशोदिप कॉम्पलेक्समधील चिकन विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी याप्रकरणी भादवी. १७० प्रमाणे ३२५, ५०४ अन्वये सलमान मुलाणी याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. सलमान व बारमध्ये गायिका मैत्रिणीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती.