scorecardresearch

नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी

तीन वाजेपर्यत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरण कार्यालय वाशी यांनी दिली आहे.

नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी
नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी

नवी मुंबईतील बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या वाशी येथे शनिवारी दुपारी दिडच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. ज्यामुळे वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल व्यवस्था बंद पडून अनेक चौकात वाहतूक कोंडीचे दृश्य पहावयास मिळत होते. छ. शिवाजी महाराज , अँरेंजा कॉर्नर, अभ्युदय बँक, म. ज्योतिबा फुले चौक आणि वाशी प्लाझा या चौकातील सिग्नल बंद पडले. या सर्वच ठिकाणी कायम वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते.

वाशी प्लाझा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची चौकी असल्याने वाहतूक पोलिसांचा राबता असतो. त्यामुळे केवळ या चौकातील वाहतूक कोंडी अवघ्या काही मिनिटात सुरळीत करण्यात आली. मात्र अन्य चौकात वाहतूक पोलीस हजर नसल्याने सुमारे १५ ते वीस मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. सध्या सर्वत्र वाहतूक कोंडी सोडवण्यात आली असून सर्वत्र वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी दिली आहे. तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरण कार्यालय वाशी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 15:02 IST

संबंधित बातम्या