देशावर जलसंकट येऊन कोसळले असताना यंदाच्या चैत्र पाडव्याला शोभायात्रेतून जलबचतीचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या शोभायात्रेत ‘निसर्गमित्र मंडळा’तील सायकल पथक आणि कुरूळकर सामाजिक संस्थेची गतिमंद मुले सहभागी होणार आहेत. शोभायात्रेत मराठी परंपरा जतन करण्याचा पनवेलकरांचा प्रमुख उद्देश असेल.
गेली १५ वर्षे पनवेलकरांची मानाची आणि प्रतिष्ठेची परंपरा म्हणून चैत्र पाडव्याची शोभायात्रा मानली जाते. चित्ररथासोबत लेझीम पथकांचा जल्लोश असेल. पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची संपत्ती जपून ठेवण्यासाठी हा सकारात्मक संदेश नक्कीच प्रभावी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. बरची पथकात १२५ लहान मुलांचा समावेश असेल, याशिवाय महिलांचे झांज पथक यात्रेत सहभागी होईल.
सकाळी सात वाजता दांडेकर मार्गावरील मराठी शाळेजवळून शोभायात्रा निघेल. शिवाजी रोड येथून आदर्श हॉटेल त्यानंतर गावदेवी मंदिराकडून धूतपापेश्वर मार्गावरून महात्मा फुले मार्ग आणि त्यानंतर विरुपाक्ष मंदिराकडून जयभारत नाका आणि टिळक रोडवरून या यात्रेची समाप्ती सावरकर चौकात होईल, असे स्वागत समितीचे अध्यक्ष अमित ओझे यांनी सांगितले.

सहभाग
* युवानाद ढोल पथकासह इतर ढोल पथके
* सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील इस्कॉन संस्था, समर्पण ध्यान केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, नाच गं घुमा महिला मंडळातील सदस्य, ‘कफ’ सिटिझन युनिटी फोरम.

‘अर्बन हाट’मध्ये चैत्रमेळा

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील ‘अर्बन हाट’मध्ये चैत्रमेळा होणार आहे. ८ मेपर्यंत हा मेळा सुरू राहील. मेळ्यात मध्यप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, आसाम, नागालँड, त्रिपुरा आणि तामिळनाडू अशा विविध राज्यांतील कारागीर सहभागी झाले आहे. साहित्य, आरास आणि सजावटीच्या वस्तू येथे उपलब्ध असतील. हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेले दागिने आणि वस्त्र-प्रावरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मेळ्यात ‘रुरल लाइव्हलीहूड मिशन’च्या वतीने ४० स्वयंसहाय्य बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला