आकाशातून झेप घेत जाणाऱ्या विमानाचे आता फारसे कौतुक उरलेले नाही. ढगांशी लपाछपी खेळत, निळ्या गगनातून विहार करणारे हे हवाईजहाज ताशी ९५० कि.मी. या प्रचंड वेगाने प्रवास करते. जमिनीपासून दहा हजार मीटर उंचीवरून तरंगत जाणारे विमान म्हणजे एक वैज्ञानिक चमत्कार होय.
माणसे आणि मालाची जलद ने-आण करणारी विमाने जेट इंजिनामुळे चालतात. या जेट विमानाची रचना विशिष्ट नि क्लिष्ट प्रकारची असते. त्यामुळेच महाकाय विमान आकाशातून झेपावू शकते.
विमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले केरोसिन तेलच असते. काही जण त्यास ‘पांढरे पेट्रोल’ असे संबोधतात. त्यास ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) असे तांत्रिक नाव आहे. काही विशिष्ट प्रकारच्या विमानात पेट्रोलसदृश इंधने वापरली जात असली तरी मोठमोठाली जेट विमाने या केरोसिन इंधनावरच उडतात. प्रारंभीच्या काळात, साध्या केरोसिन तेलाचा वापर विमाने उडविण्यासाठी केला गेला होता. हळूहळू प्रवाशांची संख्या वाढली. विमानाच्या इंजिनाची रचना बदलत गेली. नव्या इंजिनाला जास्तीत जास्त शक्ती देणाऱ्या नि सुरक्षित ठेवणाऱ्या इंधनाची गरज लागली.
ए.टी.एफ. या इंधनातील सेंद्रिय रासायनिक संयुगे ही १५० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानाला उकळतात. त्याची वाहकता प्रमाणबद्ध असते व ओतनिबदू खूपच कमी तापमानाचा असतो. एखाद्या ठिकाणी उड्डाण घेणारे विमान हवेतून तरंगत दुसऱ्या ठिकाणी उतरते. ही दोन्ही ठिकाणे लांबवरची असतात. या दोन्ही ठिकाणातील हवामानात फरक असतो. तसेच वाटेतील हवाईमार्गाचे वातावरण हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकते. हवामान थंड असो वा गरम, विमानातले इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवीत राहते. ते गरमीमुळे उडून जात नाही की थंडीमुळे गोठत नाही.
विमानाचे इंधन जळताना त्याचा काळा धूर बाहेर पडत नाही. कारण त्यातील एरोमॅटिक्स संयुगाच्या प्रमाणावर कटाक्षाने मर्यादा ठेवली जाते. विमान आकाशातून उडताना त्याचे हवेशी घर्षण होते व मोठय़ा प्रमाणात उष्णता निर्माण होते, तसेच विद्युतभार निर्माण होतात. ए.टी.एफ. या गुणी इंधनावर त्याचा काहीच विपरीत परिणाम होत नाही.

प्रबोधन पर्व:  ‘ नुसत्याच परिषदा म्हणजे आवाज करणाऱ्या घंटा..’
‘‘परिषदांमधून आपण भाषणे करण्यापलीकडे आपणांस काही करता येत नाही हे खरे, परंतु भाषणे, चर्चा किंवा ठराव यांच्या पाठीमागे काही तरी भरीव असण्याचे परिषद हे एक दृश्य चिन्ह आहे हेही तितकेच खरे आहे आणि हे ‘काही तरी’ म्हणजे प्रत्यक्ष कृती हे होय. आपण हल्ली प्रगतीच्या युगात आहोत; आणि कशाही अडचणीच्या काळातून चिकाटीने व शांतपणे मार्ग काढणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विशेषत धार्मिक संस्था यांच्या योगानेच राष्ट्राच्या प्रगतीस खरे सामथ्र्य प्राप्त होत असते. आमच्या परिषदा या प्रकारच्या संस्थांच्या केवळ मदतनीस अशा असावयास पाहिजेत; अशा संस्था जर अस्तित्वात नसतील तर नुसत्या परिषदा नसलेल्या बऱ्या. पाठीमागे विधायक कार्य करणाऱ्या संस्था नसताना भरविल्या जाणाऱ्या परिषदा ह्या नुसत्या आवाज करणाऱ्या घंटांसारख्या किंवा पर्जन्यविरहित वावटळीसारख्या विफल होऊन त्यांच्या योगाने सार्वजनिक शांततेचा मात्र भंग होत असतो! ज्याप्रमाणे एखाद्या यंत्रात फाजील ताण पडू नये, म्हणून यांत्रिक योजना केलेली असते, त्याप्रमाणे राष्ट्रीय सदसद्विवेकबुद्धीवर पडणारा ताण कमी करण्याचा आभास उत्पन्न करण्याचे काम अशा प्रकारच्या परिषदा आजही करीत असतात. कोणी म्हणतात की राष्ट्रीय सदसद्विवेकबुद्धी निर्माण करण्याचे कार्य अशा परिषदांकडून होत असते. काही काळपर्यंत तसे कदाचित होत असेल. परंतु हल्ली मात्र अशा तऱ्हेची सदसद्विवेकबुद्धी निर्माण होण्याऐवजी तिची तीव्रता कमी करण्याचे व ती अजिबात नाहीशी करण्याचे कार्य अशा परिषदांकडून होत आहे’’ – ‘समाजसुधारणा यशस्वी का होत नाहीत’ याविषयी भाषण करतानाच महर्षी वि. रा. शिंदे यांनी संस्थाजीवन सशक्त हवे, याची दिशा अशा रोकडय़ा शब्दांत दाखवून दिली होती. ‘‘सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांच्यामध्ये साहचर्य नाही हे म्हणणे जसे पोकळ व अर्थशून्य आहे, त्याचप्रमाणे समाजसुधारणा व धर्माच्या आद्य तत्त्वांचे आचरण यांजमध्ये साहचर्य नाही असे म्हणणेही तितकेच भ्रामक आहे’’ अशा शब्दांत त्यांनी या ‘पोकळ’ व ‘भ्रामक’ वादांचा समाचार घेतला होता.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
little boy gave his mother birthday surprise in flight
VIDEO : विमानात चिमुकल्याने आईला दिलं सरप्राईज; अचानक झालेली ‘ही’ घोषणा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा

मनमोराचा पिसारा: मधुमेहाशी मैत्री..
मधुमेह हा विकार आपल्या शरीरातील ‘इन्सुलिन’ या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो हे सर्वसामान्य ज्ञान आहे. मधुमेहाच्या इलाजामध्ये तोंडावाटे घ्यायच्या गोळ्या आणि अर्थात ‘इन्सुलिन’चा परिणामकारक उपयोग होतो. हेही सर्वाना ठाऊक आहे.
गेल्या काही दशकांमध्ये इन्सुलिनवर कोटय़वधी डॉलर खर्च करून संशोधन चाललं आहे, हेही माहिती असेल.. या संशोधनामध्ये अर्थातच जीवरसायनतज्ज्ञ, केमिस्ट अशी तज्ज्ञमंडळी जिवापाड मेहनत करतात. लाखो तास कष्ट करून त्यांनी इन्सुलिनचं शुद्ध स्वरूप शोधलं आणि एकदा टोचल्यानंतर शरीरात एकदम रिलीज न होता हळूहळू पाझरणारी इन्सुलिनची रसायनंही बनवली. योग्य वेळी, योग्य प्रकारे मधुमेहावरील या प्रभावी उपचारांमुळे लाखो लोकांचे डोळे वाचले, गँग्रिन होण्यापासनं हातापायाची बोटं वाचली, प्राण वाचले. हे संशोधन आधी झालं असतं तर कदाचित लोकमान्य टिळकांना दीर्घायूही लाभलं असतं; वैद्यकशास्त्रानं प्रगतीची प्रचंड झेप घेतली. आता यात मानसशास्त्र आणि इतर तज्ज्ञमंडळींचा सहभाग आहे, असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. विपणन तंत्रामधल्या मानसशास्त्रज्ञांनी इन्सुलिनच्या यशाला हातभार लावलाय, तो कसा?
मुळात इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. ही गोष्ट गोळी घेण्याइतकी सोपी नाही. कटकटीची तर आहेच, पण रुग्णांना चारचौघांत चटकन करता येण्यासारखी नाही. गैरसोयीची आहे. खेरीज इंजेक्शनला लागणारी सामग्री बरोबर बाळगावी लागते. इन्सुलिनमध्ये विलक्षण प्रगतीकारक संशोधन झालं तरी ते रुग्णापर्यंत पोहोचवायचं कसं? ही मोठी अडचण होती. एक उत्तम प्रॉडक्ट उपयोजनातल्या अडथळ्यामुळे लोकोपयोगी असून, वापरलं जात नव्हता. इथेच उपयोजित मानसशास्त्रानं सहभाग घेतला.
रुग्णांना इन्सुलिन घेण्याकरता कोणती मेथड सोपी, सुटसुटीत असेल याची मानसिक चिकित्सा वर्तनविषयक मानसशास्त्रज्ञांनी सुरू केली. अतिशय उपयुक्त सूचना केली आणि मूलभूत वैद्यक संशोधन आणि उपयोजन यामध्ये सेतू बांधला. पुढे व्यावसायिक डिझायनर नेमले आणि जन्माला आले ‘इन्सुलिन पेन’. सुटसुटीत आणि सुलभपणे वापरता येणारा एक डिव्हाइस/ मार्ग ‘इन्सुलिन पेन’नं क्रांती केली. कारण इन्सुलिन वापरण्यातल्या रुग्णांच्या अडचणी दूर झाल्या आणि रुग्णांनी उपचारांचा सहज स्वीकार केला. आज (परवडू शकणाऱ्या), लाखो रुग्णांपैकी ७५ टक्के लोक डायबेटिसच्या ट्रीटमेंटमध्ये सहभागी होत आहेत. हे प्रमाण पूर्वी अल्प होतं.
इन्सुलिनवरील एकूण संशोधनाच्या खर्चाचा किरकोळ हिस्सा ‘इन्सुलिन पेन’ची संरचना करण्यासाठी लागला. त्यात मानसशास्त्राचा सहभाग त्याहूनही अल्प-स्वल्प. पण तो इतका महत्त्वाचा ठरला की, मधुमेहींचे जीवनमान बदलून गेले. मधुमेहाशी कडू शत्रुत्व न करता ‘गोड मैत्री’ जुळून आली.
इन्सुलिनच्या उपयोजनातला हा अखेरचा टप्पा होता. शेवटची कडी होती. शर्यतींमध्ये शेवटचेच काही मीटर्स विनर ठरवितात. मानसशास्त्रानं प्रचंड झेप घेतलीय. मन गुंगवून टाकणारं संशोधन इकॉनॉमिक्स, युद्धनीती आणि सुरक्षा व्यवस्था (पोलिसिंग) या विषयात होतंय. आपण मात्र अजून मानसशास्त्र म्हणजे वेडाचा अभ्यास असल्या अडाणी कल्पना कवटाळून बसलोय. होय ना?
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com