एकाच  वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेणे याला मिश्र पीक पद्धती असे म्हणतात. पूर्वी ही पद्धती जगात सर्वत्र वापरली जात होती. मिश्र पिकातले एकादे पीक जरी अवर्षण, अतिवृष्टी, रोग किंवा वनस्पतिभक्षक कीटक अशा कोणत्यातरी आपत्तीला बळी पडले तरी त्यामुळे सर्वनाश न होता त्याच शेतात वाढणाऱ्या अन्य जातीच्या वनस्पतींपासून आपणांस काहीतरी उत्पन्न निश्चितपणे मिळावे हा मिश्र पीक पद्धतीमागचा उद्देश तर होताच, पण केवळ पिकाच्या सर्वनाशाचा धोका टाळणे एवढाच मिश्र पिकाचा उद्देश नसून योग्य घटक पिकांद्वारे जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा उपयोग अधिक चांगल्या रीतीने केला जाऊन उत्पन्नही अधिक काढता येते. ते कसे हे आपण तूर-बाजरीच्या मिश्र पिकाच्या उदाहरणावरून पाहू. बाजरी पीक पेरणीपासून ८० ते ९० दिवसांमध्ये काढणीस तयार होते, तर तूर हे पीक साधारणत:  ६ ते ७ महिने घेते. पावसाळ्याच्या आरंभी बाजरीच्या चार ओळींनंतर तुरीची एक ओळ या पद्धतीने या पिकाची पेरणी करतात. बाजरीची वाढ तुरीच्या मानाने भराभर होते, आणि तिच्या सावलीखाली तूर चांगली वाढत नाही. पण बाजरीचे पीक निघाल्यानंतर तुरीची चांगली वाढ होते. बाजरीच्या मुळ्या जमिनीत खोल जात नसल्याने बाजरी मुख्यत जमिनीच्या वरच्या थरांमधले पाणी घेते तर तुरीचे सोटमूळ चांगले १२० ते १५० सें.मी. खोल जात असल्याने ते मातीच्या खालच्या थरांमधले पाणी घेऊ शकते. जर त्या शेतात निव्वळ बाजरी किंवा निव्वळ तूर लावली असती तर दुसऱ्या जातीचे पीक घेताच आले नसते. पण वाढीचा काळ भिन्न आणि सूर्यप्रकाश आणि पाण्यासाठी परस्परांशी स्पर्धा नाही, या कारणाने एकाच शेतात वाढत असूनही या मिश्र पिकातून प्रत्येक जातीच्या शुद्ध पिकापासून मिळाले असते त्याच्या सुमारे ८० टक्के पीक बाजरी आणि तूर या दोन्ही पिकांपासून मिळते. आधुनिक काळात सुधारलेली सिंचनव्यवस्था, रासायनिक औषधे, शेतमजुरांची टंचाई आणि यांत्रिक शेती यांमुळे मिश्र पीकपद्धती मागे पडली आहे.

जे देखे रवी..    
फाळणीच्या फुफाटय़ातून पानशेत प्रलयात
पुण्यातल्या तीन वर्षांच्या वास्तव्यापैकी मी एक वर्ष काकांकडे राहिलो. त्यांचे घर मॉडर्न हायस्कूल जवळच, संभाजी उद्यानाच्या समोर होते. फाळणीनंतर भारतात आलेले लोक म्हणजे सिंधी असा पुण्या-मुंबईकडे एक समज आहे, पण त्याला अपवादही होते त्यापैकी एक म्हणजे हे माझे काका. मेहनती आणि कल्पक; परंतु स्वातंत्र्य मिळायच्या आधी इंग्रजांच्या विरोधात राष्ट्रीय शाळा काढाव्यात, अशी हाक देण्यात आली आणि असल्या एका शाळेत माझ्या काकांचा प्रवेश झाला. शाळा विनाअनुदानित आणि सरकारमान्य नव्हत्या, त्यामुळे काळाच्या प्रवाहात त्या जेव्हा बंद पडल्या तेव्हा यातले विद्यार्थी शिक्षित असूनही निराधार झाले. त्यांना पुढे विद्यापीठात जाणे अशक्य झाले. तेव्हा माझ्या काकांना येन केन प्रकारेण अभियांत्रिकीच्या डिप्लोमाला बसावे लागले आणि त्यात पास झाल्यावर जी नोकरी लागली ती थेट कराचीला. या काकांचा माझ्यावर खूप जीव होता. मी आणि ते दोघेच ऑस्ट्रेलिया इंग्लंडहून येणारी अंधुक आवाजातली क्रिकेट कॉमेंट्री कान लावून ऐकत असू. ते मला कराचीच्या गोष्टी सांगत. तिथे दक्षिण सभा होती आणि मराठी शिकण्याची सोय होती. दक्षिण सभेत मराठी कार्यक्रम चालत कधी गाण्याचे तर कधी नाटकाचे.
मग एकदमच नोकरी संसाराचा सारीपाट उधळला. फाळणी झाली. सर्वत्र घबराट पसरली आणि माझी काकू तिच्या दोन मुलांना म्हणजे चुलत भावांना घेऊन आगगाडीने मजल-दरमजल करीत पुण्याला आली; परंतु तिने एक विक्रम केला. तिच्याकडे मुले सांभाळायला एक नोकर होता. लहान पोरसवदा सिंधी मुलगा. त्यालाही कनवाळूपणे घेऊन आली. काका नंतर आले. आल्यावर दस्तऐवज तपासल्यावर काही महिन्यांनी सरकारी नोकरी मिळाली. तोवर या करारी बाईने हार न खाता दीड खोल्यांत संसार केला. त्या वेळच्या पुण्यात कचरे पाटलाच्या विहिरीच्या पलीकडे नुसते रान होते. तिथे कोणीतरी खोल्या बांधल्या होत्या त्यात ही मंडळी राहत असत. पुढे ही घोले रोडजवळची जागा मिळाली खूप नंतर पुण्याजवळ होऊ घातलेल्या पानशेत धरणावर ओव्हरसीयर म्हणून त्यांची नेमणूक झाली. सकाळी लवकर जात, रात्री उशिरा येत. मोठय़ा अभिमानाने ते धरणाविषयी बोलत आणि पहिल्याच पावसाळ्यात धरण पडले आणि महापूर आला. लोकानुयय करण्यासाठी राजकारणी मंडळींनी त्या धरणाचे बांधकाम लवकर संपविले, असा एक प्रवाह होता. त्या महापुरात माझ्या काकांचे घर बुडाले आणि कराचीची पुनरावृत्ती झाली. मी तोपर्यंत मेडिकल कॉलेजमध्ये होतो. त्यांना मदत करायला पुण्याला गेलो होतो. त्या चिखलाने माखलेल्या घरात काकू साफसफाईच्या कामात राबत होते. परत मुंबईला आलो तेव्हा आगगाडीत एकटाच रडू लागलो. दोन-तीन तासांच्या हाहाकारात सगळा सत्यानाश झाला होता. आधी कराची आणि आता पानशेत.. मनात आले, हा काय न्याय झाला!
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

वॉर अँड पीस                                                            
अंग बाहेर येणे
स्त्रियांचे अंग बाहेर येणे म्हणजे योनी बाहेर येणे ही गोष्ट आपल्या तक्रारी लपवण्यामुळे बळावते. कारणे काहीही असोत. आपले अंग बाहेर येत आहे अशी शंका आल्याबरोबर त्या स्त्रीने आपल्या नेहमीच्या स्त्री डॉक्टर वैद्यांना दाखवणे नितांत गरजेचे आहे. गुद बाहेर येण्याच्या नेहमीच्या वातवृद्धीच्या कारणाप्रमाणे स्त्रियांच्या फाजील व वारंवार विटाळ हेही कारण लक्षात घ्यावे लागते. वारंवार मोरीवर जाण्याची खोड, ताकदीच्या बाहेर काम करणे, वातुळ पदार्थ खूप खाणे, मासिक विटाळ अनियमित व लवकर-लवकर येणे यामुळे योनी अवयवाची आकुंचन प्रसरण ‘इलॅस्टिसिटी’ कमी होते. या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत मलमूत्राचे, तसेच पाळीचे काळात योनी अवयवाचा भाग थोडय़ा प्रमाणात बाहेर येतो व नंतर आत जातो. बहुसंख्य मायभगिनी लाजेकाजेस्तव हा विकार लपवतात व त्यामुळे अकारण शस्त्रकर्माची गरज ओढवून घेतात. त्या अवयवांच्या स्नायूंच्या लवचिकपणावर लक्ष द्यायला हवे. रोग प्राथमिक अवस्थेत असताना पोटात वायू धरणार नाही, अजीर्ण होणार नाही, रात्री उशिरा जेवण होणार नाही अशी काळजी घेतल्यास हा विकार कमीत कमी औषधांनी लगेचच आटोक्यात येतो. मलमूत्राचे वेग कमी होतील याकडे रुग्णाचे व चिकित्सकांचे लक्ष हवे. योनीभ्रंश विकाराकरिता उपचारांचे दोन भाग आहेत. अंगावरून खूप जात असल्यास, रुग्ण कृश असल्यास शतावरीघृत न विसरता सकाळ-सायंकाळ दोन चमचे घ्यावे. ते न मिळाल्यास एक चमचा शतावरीचूर्ण, चांगल्या तूपावर भाजून त्याची लापशी करावी व नियमितपणे घ्यावी. शतावरी कल्प दोन चमचे दोन वेळा दुधाबरोबर घ्यावे. विटाळ जाण्याच्या काळात, दीर्घकाळ व मोठय़ा प्रमाणावर विटाळ जात असल्यास, प्रवाळ, कामदुधा, चंदनादीवटी प्रत्येकी तीन गोळय़ा दोन वेळा घ्याव्यात. सकाळी एक चमचा उपळसरीचूर्ण घ्यावे. रात्री जेवणानंतर फिरून यावे व एक चमचा त्रिफळाचूर्ण घ्यावे. योनीच्या जागी शतावरीसिद्ध तेलात भिजवलेल्या कापसाची पट्टी योनीभागावर ठेवावी व काही काळ उताणे झोपावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
१९ जानेवारी
१८९२ >  मराठीभाषक मध्यमवर्गातील दोषांवर हसू-हसवू शकणाऱ्या निर्विष विनोदाचे उद्गाते, ‘चिमणरावांचे चऱ्हाट’ व अन्य पुस्तकांचे लेखक आणि पाली भाषेचे अभ्यासक चिंतामण विनाय (चिं. वि.) जोशी यांचा जन्म. त्यांचे निधन १९६३ साली झाले.
१९५८ > वैदर्भी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विदर्भ साहित्य संघाचे एक संस्थापक नारायण केशव बेहेरे यांचे निधन. १९२७ साली त्यांनी ‘१८५७’ हा ग्रंथ लिहिला व स्वत: प्रकाशितही केला होता. सप्तर्षी ही त्यांची गाजलेली राष्ट्रीय कविता. काही सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या होत्या.
१९९७ >  समीक्षक, कादंबरीकार सुलोचना राम देशमुख यांचे निधन. ‘एस’ या टोपणनावाने त्या प्रसिद्ध होत्या. ‘आदिमाया’ , ‘काचापाणी’, ‘कामायनी’ आदी कादंभ्राय़ा त्यांनी लिहिल्या.
२००६ >  संत साहित्याचे गाढे अभ्यासक  डॉ. प्र. ना. अवसरीकर यांचे निधन. दासबोधाची गुलाबराव महाराजकृत प्रत, सार्थ भक्तिमार्गप्रदीप यांचे संपादन करणाऱ्या प्र. ना. यांनी ‘सामाजिक कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा’ हे पुस्तकही सिद्ध केले होते.
संजय वझरेकर